वाहतूक नियम पाळा, 35 कोटी रुपयांची बक्षिसं जिंका

वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन करणा-या वाहनचालकांना आता चक्क बक्षीस दिलं जाणार आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियम पाळावेत, यासाठी हा नवा प्रयोग राबवला जात आहे. 

Jun 07, 2023, 23:21 PM IST

Nagpur Traffic Police :  वाहतूक नियमांचं उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई होते. मात्र, वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करणा-यांचं काय? अशा सुजाण आणि जबाबदार वाहनचालकांना आता चक्क बक्षिसं दिली जाणार आहेत.  होय, वाहतुकीचे नियम पाळा आणि बक्षीस मिळवा अशी नवी योजना उपराजधानी नागपुरात सुरू झाली आहे. 

1/7

वाहतूक नियमांचं पालन सगळ्यांनी केल्यास रस्ते अपघातांचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यामुळंच शिस्तप्रिय नागरिकांना बक्षीस देण्याची संकल्पना कौतुकास्पद अशी आहे. 

2/7

या प्रकल्पात तब्बल 35 कोटी रुपयांची बक्षिसं वाटली जाणार आहेत. 

3/7

बीपीएल पेट्रोल पंपासह तब्बल १०० हून अधिक ब्रँडच्या वस्तू खरेदीसाठी हे पॉईंट्स रिडीम केले जाऊ शकतात.

4/7

नागपुरातील 10 सिग्नलवर RFID स्कॅनर लावले जातील वाहन सिग्नलवर थांबेल, तेव्हा अॅपच्या माध्यमातून 10 पॉईंट्स वाहनचालकाला मिळतील.

5/7

नागपुरात जे वाहनचालक ट्रॅफिक नियम काटेकोर पाळतील, त्यांना रिवार्ड पॉईंट्स दिले जातील

6/7

बक्षिसं जिंकण्यासाठी वाहनचालकांना ट्रॅफिक रिवार्ड अॅप डाऊनलोड करावं लागेल.

7/7

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाच्या पुढाकारानं आणि सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन्स प्रा. लि. कंपनीच्या मदतीनं हा प्रयोग राबवला जातोय.