Tulsi Rules : घरात तुळशीचं रोप लावलेलं असेल तर हे नियम पाळा! नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

Tulsi Rules : हिंदू धर्मात तुळशीची देवतेप्रमाणे पूजा केली जाते. त्यामुळे प्रत्येक घरातील तुळशीचं रोप असतं. तुमच्या घरातही तुळशीचं रोप असेल किंवा तुम्ही तुळशी विवाहसाठी तुळस लावणार असाल तर शास्त्रानुसार तुम्हाला हे नियम माहितीच पाहिजे. 

Nov 22, 2023, 08:21 AM IST
1/10

तुळस ही शुभ मानली जाते, त्यामुळे वाळलेली तुळस ठेवणेही अशुभ मानलं जातं. वाळलेली तुळस घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा येते आणि घरावर आर्थिक संकट कोसळतं. 

2/10

वाळलेली तुळस जमिनीत गाडा किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्या. वाळलेली तुळस चुकूनही कचऱ्यात किंवा पेटवू नका. तुळशीला जाळणं नुकसानदायक असतं. 

3/10

आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या झाडाला हात लावू नका. रात्री चुकूनही तुळशीची पानं तोडू नका. तर एकादशी आणि द्वादशीलाही तुळशीची पानं तोडू नका. 

4/10

तुळशीचं रोप किचन किंवा बाथरूमजवळ अजिबात ठेवू नका. 

5/10

तुळशीच्या रोपाजवळ झाडू ठेवू नका. त्याशिवाय तिथे झाडू मारू नका. तर तुळशीच्या आजूबाजूची जागा स्वच्छ करण्यासाठी कापडाचा वापर करा. 

6/10

तुळशीजवळ कोणतंही काटेरी रोप ठेवणं शास्त्रानुसार चुकीचं मानलं जातं. 

7/10

तुळशीचे रोप कधीही जमिनीवर लावायचं नाही. तर कुंडीत किंवा वृंदावन तुळशीचं लागवड करावी.   

8/10

घरात तुळशीचं रोप उत्तर आणि ईशान्य दिशेला लावावी. चुकीच्या दिशेला लावलेल्या तुळशीच्या रोपामुळे घरात अशांतता पसरते. 

9/10

मंगळवार, रविवार आणि शुक्रवारी तसंच सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळीही तुळशीची पानं तोडणं अशुभ मानलं जातं.  

10/10

घराच्या मुख्य दारावर तुळस ठेवणं चुकीचं मानलं जातं. मुख्य दारात तुळस ठेवल्यास देवी लक्ष्मी नाराज होते आणि वास्तु दोष निर्माण होतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)