ऑनलाइन स्कॅम टाळण्यासाठी या 5 टिप्स करा फॉलो , कोणीही तुमचे डिव्हाइस हॅक करू शकणार नाही

तेजश्री गायकवाड | Oct 23, 2024, 15:32 PM IST
1/6

Online Scam: वाढलेल्या ऑनलाइन व्यवहारामुळे ऑनलाइन घोटाळे स्कॅम झाले आहेत. स्कॅमर लोकांचे स्मार्टफोन ते कम्प्युटर असे वेगवेगळ्या प्रकारेचे डिव्हाइस हॅक करतात. स्कॅमर मालवेअर स्थापित करतात आणि त्याद्वारे त्यांचा वैयक्तिक डेटा चोरतात.अशात तुमचा डेटा सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे ठरते. काही टिप्स फॉलो करून तुम्ही ऑनलाइन स्कॅम टाळू शकता. आज आम्ही तुम्हाला ऑनलाइन स्कॅम टाळण्याचे उपाय जाणून जाणून घ्या. 

2/6

मजबूत पासवर्ड वापरा

तुमच्या सर्व ऑनलाइन खात्यांसाठी मजबूत पासवर्ड वापरा. पासवर्डमध्ये अक्षरे, संख्या आणि विशेष वर्णांचा समावेश असावा. पासवर्ड नियमितपणे बदलत राहा. पासवर्ड मॅनेजर वापरा जेणेकरून तुम्हाला तुमचे सर्व पासवर्ड लक्षात ठेवण्याची काळजी करण्याची गरज नाही.

3/6

फिशिंग ईमेलपासून सावध रहा

फिशिंग ईमेलवर अनेकदा संशयास्पद लिंक्स किंवा फाइल्ससह येतात. या लिंक्स किंवा फाइल्सवर क्लिक केल्याने तुमच्या डिव्हाइसवर मालवेअर इन्स्टॉल होऊ शकते आणि तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते. जर तुम्हाला असा कोणताही मेल आला ज्यामध्ये लिंक दिली असेल, तर त्यावर क्लिक करण्यापूर्वी, खात्री करा की मेल एखाद्या विश्वासू व्यक्तीने पाठवला आहे.

4/6

सुरक्षित नेटवर्क वापरा

नेहमी सुरक्षित नेटवर्क वापरण्याची विशेष काळजी घ्या. सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क वापरणे टाळा. तुम्हाला सार्वजनिक वाय-फाय वापरायचे असल्यास, तुम्ही VPN वापरत असल्याची खात्री करा.

5/6

तुमचे डिव्हाइस अपडेट ठेवा

तुमची ऑपरेटिंग सिस्टम, ब्राउझर आणि इतर सॉफ्टवेअर नियमितपणे अपडेट करा. सॉफ्टवेअर अपडेटमध्ये अनेकदा सुरक्षा पॅच समाविष्ट असतात जे तुमचे डिव्हाइस सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.

6/6

ऑनलाइन खरेदी करताना काळजी घ्या

ऑनलाइन खरेदी करतानाही काळजी घ्यावी. ऑनलाइन शॉपिंग फक्त विश्वसनीय वेबसाइटवरूनच करा. वेबसाइट URL HTTPS:// ने सुरू होत असल्याची खात्री करा. तुमचे क्रेडिट कार्ड तपशील शेअर करण्यापूर्वी वेबसाइटची सुरक्षा तपासा.