दुनिया देईल खूप प्रेम, मिळेल मान-सन्मान, चाणक्यनीती मधील या 3 गोष्टी ठेवा लक्षात!

चाणक्य यांची धोरणे जीवनात खूप उपयुक्त ठरतात. या धोरणांचे पालन केल्याने तुम्हाला यश तर मिळतेच. सोबत  समाजात तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा देखील वाढते.

Pravin Dabholkar | Sep 10, 2024, 18:36 PM IST

Chanakya Niti in Marathi:चाणक्य यांची धोरणे जीवनात खूप उपयुक्त ठरतात. या धोरणांचे पालन केल्याने तुम्हाला यश तर मिळतेच. सोबत  समाजात तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा देखील वाढते.

1/7

Chanakya Niti: दुनिया देईल खूप प्रेम, मिळेल मान-सन्मान, चाणाक्यंच्या 3 गोष्टी ठेवा लक्षात!

Chanakya Niti 3 things for World gives Respect Marathi News

Chanakya Niti in Marathi: इतिहासात जेव्हा जेव्हा अत्यंत बुद्धिमान, अर्थतज्ञ, मुत्सद्दी आणि कुशल राजकारणी यांची चर्चा होईल तेव्हा चाणक्य यांचे नाव अग्रक्रमाने येईल.

2/7

धोरणे जीवनात खूप उपयुक्त

Chanakya Niti 3 things for World gives Respect Marathi News

चाणक्य यांची धोरणे जीवनात खूप उपयुक्त ठरतात. या धोरणांचे पालन केल्याने तुम्हाला यश तर मिळतेच. सोबत  समाजात तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा देखील वाढते.

3/7

मान-सन्मान मिळवणेही महत्त्वाचे

Chanakya Niti 3 things for World gives Respect Marathi News

जीवनात पैसा कमावण्यासोबतच मान-सन्मान मिळवणेही महत्त्वाचे आहे. पैसा कमावल्यावर तो खर्च होतो, पण आदर हे असे भांडवल आहे की जे कधीही संपत नाही. पण आदर मिळवणे हे सोपे काम नाही. तर आदर मिळणे हे तुमच्या कामावर आणि वागण्यावर अवलंबून असते.

4/7

चाणक्याच्या या धोरणांचे पालन

Chanakya Niti 3 things for World gives Respect Marathi News

काहीवेळा लोक जाणूनबुजून किंवा नकळत अशा गोष्टी करतात की त्यामुळे निर्माण झालेला आदर आणि सन्मानही नष्ट होतो. जर तुम्हाला तुमचा मान राखायचा असेल तर चाणक्याच्या या धोरणांचे पालन करा.

5/7

नम्र व्हा

Chanakya Niti 3 things for World gives Respect Marathi News

माणसाचा स्वभाव नम्र असावा. नम्र असणे ही एक अशी कला आहे की, तुमच्या स्वभावाचा आणि आचरणाचा इतर लोकांवरही सकारात्मक प्रभाव पडतो. नम्र लोक वादविवादापासून दूर राहतात. अशा लोकांना कमी शत्रू असतात. त्यांना इतरांकडून आदर मिळतो आणि सर्वत्र त्यांचा आदर केला जातो.

6/7

निमंत्रित केल्याशिवाय कोणाच्याही घरी जाऊ नका

Chanakya Niti 3 things for World gives Respect Marathi News

चाणक्यचे धोरण असे सांगते की जोपर्यंत आदरपूर्वक आमंत्रण दिले जात नाही तोपर्यंत कोणाच्याही घरी जाऊ नका. न बोलावता कोणाच्या घरी गेलात किंवा कोणाच्या घरी कामाशिवाय गेलात तर आदर कमी होतो. जोपर्यंत कोणी तुम्हाला राहण्यास सांगत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणाच्याही घरी राहू नका.

7/7

इतरांना आदर द्या

Chanakya Niti 3 things for World gives Respect Marathi News

जर तुम्हाला आदर मिळवायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला इतरांना आदर द्यावा लागेल. ही सवय लावल्यास तुमचा आदर नक्कीच वाढेल.