आता पत्र लिहायलाच लागतंय! जगातील एकमेव तरंगतं पोस्ट ऑफिस इतक्या जवळ असताना कशाला उद्याची बात?

Floating Post Office In World: पत्रव्यवहार कमी झाला असला तरीही जगातील एकमेव तरंगत्या पोस्टातून नक्की पाठवा एकतरी पत्र... पाहा या कमाल ठिकाणाचे कमाल फोटो.

Jul 18, 2024, 11:57 AM IST

Floating Post Office In World: पत्रव्यवहार... पत्र, तार, मनीऑर्डर... हे शब्द सध्या कालबाह्य होताना दिसत आहेत. कारण ठरतं ते म्हणजे तंत्रज्ञानाची उपलब्धता. 

1/8

शेवटचं पत्र

Floating Post Office In World  kashmir srinagar photos

Floating Post Office In World: तुम्हाला शेवटचं पत्र कधी आलंय? किंवा तुम्ही कोणासाठीतरी शेवटचं पत्र केव्हा लिहिलंय? आठवा....   

2/8

पत्र

Floating Post Office In World  kashmir srinagar photos

कदाचित नाही आठवणार. कारण, पत्रव्यवहारासापून मेसेजिंग आणि व्हिडीओ कॉलिंगदरम्यान इतका मोठा काळ लोटला की, पत्र लिहिण्यासाठी हातात घेतलेली लेखणीसुद्धा काळासोबतच मागे राहिली. 

3/8

तरंगतणारं पोस्ट ऑफिस

Floating Post Office In World  kashmir srinagar photos

हल्ली बिलं किंवा एखादा सरकारी कागदपत्र वगळता प्रियजनांची पत्र येणं किंवा ती पाठवणं खरंतर थांबलंय. पण, जगात एक असं पोस्ट ऑफिस आहे, जिथं आल्यावर अनेकांनाच पत्र पाठवण्याचा मोह आवरत नाही. कारण, हे आहे जगातील एकमेव पाण्यावर तरंगतणारं पोस्ट ऑफिस. 

4/8

काश्मीर

Floating Post Office In World  kashmir srinagar photos

काश्मीरच्या सुंदर निसर्गाची ज्याप्रमाणं अनेकांनाच भुरळ पडते, अगदी त्याचप्रमाणं या तरंगत्या पोस्ट ऑफिसमुळंही हे काश्मीर चर्चेत आहे. पर्वरांचं सुरेख कोंदण, मधोमध दल लेक आणि तिथंच एका हाऊसबोटमध्ये सजलंय हे तरंगतं पोस्ट ऑफिस. 

5/8

टपालसेवा

Floating Post Office In World  kashmir srinagar photos

फक्त भारतातील नव्हे, तर हे जगभरातील एकमेव तरंगतं पोस्ट ऑफिस आहे. टपालसेवा पुरवण्यासमवेत या पोस्ट ऑफिसवळून निसर्गाच्या अद्बूत लीला  पाहता येतात. 

6/8

हाऊसबोट

Floating Post Office In World  kashmir srinagar photos

लाकडापासून तयार करण्यात आलेल्या पारंपरिक हाऊसबोटमध्ये हे पोस्ट ऑफिस तयार करण्यात आलं आहे. बाहेरून पाहताना ते एखाद्या शिकारा किंव हाऊसबोटप्रमाणच दिसतं.   

7/8

सुरुवात...

Floating Post Office In World  kashmir srinagar photos

1953 मध्ये स्थानिकांना टपाल सेवा पुरवण्यासाठी म्हणून या तरंगत्या पोस्ट ऑफिसची सुरुवात करण्यात आली. 1970 मध्ये ते अधिकृतरित्या कार्यान्वित करण्यात आलं. 

8/8

पर्यटन विकासात मोलाची भर

Floating Post Office In World  kashmir srinagar photos

तरंगत्या पोस्ट ऑफिसबाबत काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये कमालीचं कुतूहल पाहायला मिळतं. त्यामुळं इथं या पोस्टाच्या शिक्क्यासह येणारा प्रत्येकजण आपल्या प्रियजनांना पत्र पाठवताना दिसतो. हे पोस्ट ऑफिस काश्मीरच्या पर्यटन विकासात मोलाची भर टाकतो.