मुंबईत लढवणार 25 जागा? विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची रणनिती ठरली

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची रणनिती ठरली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाली त्या मतदारसंघावर ते दावा करणार आहेत. 

| Jul 18, 2024, 11:32 AM IST
1/7

लोकसभेत मोठं यश मिळवल्यानंतर आता ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकींसाठी कंबर कसलीय. ठाकरेंनी राज्यभरातील जागांची चाचपणी करण्यास सुरुवात केलीय. अशातच आगामी विधानसभेत ठाकरेंची नजर प्रामुख्यानं मुंबईवर असेल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. 

2/7

तर वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यताय. याशिवाय अनेक नव्या चेह-यांना विधानसभा निवडणुकीसाठी  ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याचं बोललं जातंय.  मविआत निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार असून मविआच्या बैठकांमध्ये या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याचंही सुत्रांनी सांगितलंय.  

3/7

ठाकरेंची नजर असलेल्या संभाव जागा कोणत्या त्यावर एक नजर टाकूयात. शिवडी, भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर मतदारसंघासाठी आग्रही आहेत. 

4/7

त्यासोबत भांडुप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व आणि दिंडोशी या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गट दावा करणार आहेत. 

5/7

अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, दहिसर आणि गोरेगाव हे मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मिळावे अशी त्यांची इच्छा आहे. 

6/7

वर्सोवा, वांदे पूर्व, विलेपार्ल, कुलाबा आणि वडाळा या मतदारसंघातही शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निवडणूक लढवतील असा आग्रह त्यांनी धरला आहे. 

7/7

तसंच चांदिवली, बोरिवली, मलबार हिल, अणुशक्ती नगर आणि मानखुर्द शिवाजीनगर असे एकूण 25 जागांसाठी शिवसेना ठाकरे गट दावा करणार आहे.