लालबागच्या राजाची पहिली झलक, यंदा शिवरायांच्या राज्याभिषेकाचा देखावा

Lalbaugcha Raja : ही शान कोणाची...' लालबागच्या राजाची... लाखो भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाची पहिली झलक आज दाखवण्यात आली. यंदा राजा 90व्या वर्षात पदार्पण करतोय. यावेळी लालबागच्या राजाच्या दारी रायगडाची (Raigad) प्रतिकृती साकारण्यात येत आहे

राजीव कासले | Sep 15, 2023, 19:46 PM IST

Lalbaugcha Raja : ही शान कोणाची...' लालबागच्या राजाची... लाखो भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाची पहिली झलक आज दाखवण्यात आली. यंदा राजा 90व्या वर्षात पदार्पण करतोय. यावेळी लालबागच्या राजाच्या दारी रायगडाची (Raigad) प्रतिकृती साकारण्यात येत आहे

1/7

मुंबईचा लाडका आणि लाखो भक्तांचा दैवत असणाऱ्या लालबागच्या राजाची पहिली झलक आज दाखवण्यात आली. लालबागच्या राजाचं यंदाचं नव्वदावं वर्ष आहे. 1934 मध्ये मुंबईतील प्रसिद्ध  लालबाग बाजारपेठेत राजाची स्थापना झाली.

2/7

जगभरातील गणेशभक्तांचं अराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाचं आज पहिलं दर्शन गणेशभक्तांना झालं. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा संपुर्ण जगभर साजरा करण्यात येतोय.  

3/7

या निमित्ताने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही यावर्षी लालबागचा राजाचा दरबार किल्ले रायगडावरील राज सदरची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. 

4/7

350 शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यात येतोय.

5/7

2008 सालापासून जेष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हे लालबागच्या राजाचा देखावा उभारत आहेत. यावर्षी त्यांचे निधन झाले, मात्र त्यांनी लालबागाच्या राजाचा दरबार यंदा कसा असणार याचा देखावा आपल्या कलेतून साकारून ठेवला होता. 

6/7

लालबागच्या राजाला नितिन देसाई यांनी आपली शेवटची कला वाहीली आहे. नितीन देसाई यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत आज लालबागच्या राजाच्या दरबारात मंडळाकडून त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

7/7

गणेशोत्सव काळात देश-परदेशातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. राजकारण्यांपासून ते मोठमोठ्या सिनेतारकांपर्यंत सर्व जण लालबागच्या चरणी लीन होतात.