बाबा सिद्दीकी...सलमान आणि शाहरुख यांच्यातील भांडण मिटवणारा नेता; इफ्तार पार्टीत झाले मनोमिलन
सलमान आणि शाहरुख यांच्यातील भांडण मिटवणारा नेता अशी बाबा सिद्दीकी यांची ओखळ आहे.
Firing on Baba Siddique : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे भागात ही घटना घडली. सिद्दीकी हे त्यांचा मुलगा झिशान याच्या कार्यालय परिसरात असताना, 3 जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यातली 1 गोळी बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागली होती. त्यांना तातडीनं लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. राजकारणी असलेले बाबा सिद्दीकी यांचे बॉलिवुडशीही चांगले संबंध होते. यामुळे बॉलिवुलडलाही या घटनेनं मोठा धक्का बसलाय. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्याशी त्यांचे चांगले संबध होते. बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीची बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चा असते.