मुंबईतील प्रसिद्ध पर्यटनस्थळं, मजा मस्तीसह मुलांच्या ज्ञानात भर घालतील; दिवाळीची सुट्टी संपण्याआधी फिरुन या

Picnic Spot Near Mumbai : मुंबईतील हे पिकनिक स्पॉट खास लहान मुलांसाठी आहेत. 

| Nov 09, 2024, 15:36 PM IST

Picnic Spot Near Mumbai for Kids : दिवाळी सुट्टी संपत आली आहे. यामुळे मुलांना कुठे फिरायला न्यायचं असा प्रश्न पालकांना पडला आहे. मुलांची आणि पालकांची पहिली पसंती ही राणीची बाग असते. मात्र, या व्यतीरीक्त मुंबईत असे अनेक पिकनिक स्पॉट आहेत जिथे लहान मुलांना नेता येईल. या पर्यटनस्थळांना भेट दिल्यावर मजा मस्ती मुलांच्या ज्ञानात भर पडणार आहे. 

 

1/9

मुबंईतील सर्वात प्रसिद्ध आणि लहान मुलांचे आवडते पर्यटन स्थळ म्हणून राणीची बाग खूपच प्रसिद्ध आहे. मात्र, मुंबईत अशी आणखी काही ठिकाणं आहेत जिथे लहान मुलांना फिरायला नेता येईल. एका दिवसात या ठिकाणांना भेट देता येईल. 

2/9

छोटा काश्मिर

गोरेगाव येथे असलेले छोटे काश्मिर हे ठिकाण लहान मुलांसाठी उत्तम पिकनीक स्पॉट आहे. येथे मोठे गार्डन. यासह येथे बोटिंगचाही आनंद लुटता येतो.   

3/9

नेहरु सायन्स सेंटर

वरळी येथे असलेले नेहरु सायन्स सेंटर हे लहान मुलांचे कुतूहल वाढवणारे तसेच त्यांच्या ज्ञानात भर घालणारे ठिकाण आहे. येथे विज्ञानाशी संबधीत अनेक प्रयोग येथे पहायला मिळतात.

4/9

मत्स्यालय

मुलांना सागरी जीवांची ओळख करुन द्यायची असेल तर मरीन लाईन्स येथे असेलेले मत्स्यालय देखील चांगला पर्याय आहे. येथे लहान मुलांना विविध प्रकारचे मासे तसेच सागरी जीव पहायला मिळतील.

5/9

नेहरु तारांगण

मुलांना अंतराळ तसेच ग्रह, ताऱ्यांच्या निरीक्षणाची आवड असेल तर येथे नक्की घेऊन जा. नेहरु तारांगण येथे आकाशाचे आभासी भ्रमण करता येते. येथे मुलांना निश्चितच खास अनुभव मिळेल. 

6/9

बॉटनिकल गार्डन

मुलांना सायन येथील बॉटनीकल गार्डनमध्ये नक्की घेऊन जा. या गार्डनमध्ये विविध प्रकारची औषधी झाडे पहायला मिळतात.

7/9

लायन सफारी

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्कमध्ये मध्ये मुलांना लायन सफारीचा देखील अनुभव घेता येईल. एका बसमधूल ही लायन सफारी घडवली जाते. लायन सफारी दरम्यान सिंह तसेच वाघ पहायला मिळतात.  

8/9

कान्हेरी गुंफा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फिरताना कान्हेरी गुंफा येथे देखील भेट देता येवू शकते.  मुलांना इतिहासाठी ओळख करुन द्यायची असेल तर कान्हेरी गुंफा येथे नक्की घेऊन जा.  येथे बैद्धकालीन लेण्या पहायला मिळतात.   

9/9

नॅशनल पार्क (संजय गांधी राष्ट्रीय उद्याना)

बोरीवली येथील नॅशनल पार्क अर्थात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बेस्ट ऑप्शन आहे. येथे मुलांना वनराणी जंगल सफारीचा आनंद लुटता येईल. येथे एका टॉयट्रेनमधून जंगल सफारीचा अनुभव घेता येतो.