हिवाळ्यातसुद्धा गुलाबाच्या झाडावर उमलतील टवटवीत फुले; जाणून घ्या टीप्स

Rose plant in Winter: हिवाळ्यात झाडांची पुरेशी वाढ होत नाही. सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ थांबण्याचा धोका असतो. त्यातल्या त्यात गुलाबाची झाडे तर सर्वांच्याच आवडीची असतात. परंतु, हिवाळ्यात गुलाबाच्या झाडांवर हवी तशी फुले उमलत नाहीत. हिवाळ्यातसुद्धा टवटवीत फुले उमलण्यासाठी तुम्ही 'या' टीप्सचा वापर करु शकता. 

Jan 14, 2025, 13:04 PM IST
1/7

हिवाळ्यात पुरेसे ऊन मिळत नसल्याने झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते. झाडांची वाढ होण्यासाठी आपल्याला झाडांकडे खास लक्ष द्यावे लागते.   

2/7

त्यापैकी घरात फुलझाड्यांच्या कुंड्या तर सर्वांच्याच पसंतीच्या असतात. त्यापैकी सर्वांनाच घरात गुलाबाचे रोप असावे असे वाटते. हिवाळ्यात खास करुन गुलाबाच्या झाडांवर हवी तशी फुले उमलण्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा.   

3/7

मोहरीचे खत

हिवाळ्यात गुलाबाच्या झाडांवर टवटवीत फुले उमलण्यासाठी मोहरीचे खत अत्यंत फायदेशीर ठरते. काळ्या किंवा पिवळ्या मोहरीच्या खताचा वापर झाडाच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे.  

4/7

मोहरीचे खत कसे बनवावे?

सर्वप्रथम बाजारातून आणलेल्या मोहरीच्या खतात पाणी टाकून त्यात मठ्ठा मिसळा. हे मिश्रण 3 दिवस झाकून ठेवा.  

5/7

कसा करावा वापर?

3 दिवस झाकून ठेवलेल्या खताच्या मिश्रण कुंडीतील मातीवर टाका. कुंडीत हे मिश्रण टाकल्यानंतर 15 ते 20 दिवस दूसऱ्या कोणत्याच खताचा वापर करु नका.  

6/7

कुंडी किती मोठी असावी?

बऱ्याचदा कुंडीचा आकार लहान असल्याने फुले उमलण्यास समस्या निर्माण होतात. गुलाबाच्या रोपासाठी कमीत कमी 15 ते 18 इंचाची कुंडी असावी. तसेच, कुंडीतील रोपाला पाणी घालण्याची वेळ आणि प्रमाणही योग्य असले पाहिजे.   

7/7

'या' गोष्टीकडे द्या विशेष लक्ष

गुलाबाच्या झाडासाठी कुंडीतील पाण्याचे अतिप्रमाण धोक्याचे ठरु शकते. अधिक प्रमाणात पाणी गुलाबाची मुळे कमकुवत करण्यासाठी कारणीभूत ठरते. अशात, आवश्यकतेनुसार झाडाला पाणी घाला.