'ड्रायव्हरने त्याच्या पँटची चैन उघडून...'; अभिनेत्रीने सांगितला लिफ्ट मिळाल्यानंतरचा धक्कादायक अनुभव

Sexual Harassment Attempt On Actress: या अभिनेत्रीने तिच्याबरोबर घडलेला हा भयानक घटनाक्रम एका मुलाखतीमध्ये सांगितला असून नेमकं त्यानंतर तिने काय केलं याबद्दलही माहिती दिली. या घटनेवरुन महिलांची सुरक्षा किती चिंतेचा विषय आहे हे अधोरेखित होत असल्याचं ती म्हणालीय. नक्की घडलं काय जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Jul 28, 2024, 12:44 PM IST
1/10

Tillotama Shome Sexual Harassment

अभिनेत्री तिलोत्तमा शोम ही बॉलिवूडमधील अंडर रेटेड अभिनेत्रींपैकी एक आहे. उत्तम कौशल्य असूनही म्हणावी तितकी लोकप्रियता न मिळालेली ही अभिनेत्री मागील काही काळापासून तिच्या हटके चित्रपट आणि भूमिकांमुळे चर्चेत आहे. 

2/10

Tillotama Shome Sexual Harassment

कमर्शिअल तसेच प्रायोगिक चित्रपटांमध्ये स्क्रीनवर अगदी सहज वावरताना दिसणाऱ्या तिलोत्तमा शोमने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. 

3/10

Tillotama Shome Sexual Harassment

तिलोत्तमाने 'लस्ट स्टोरीज 2', 'सर', 'कोटक फॅक्टरी' सारख्या चित्रपटानंतर आता ती  'नेटफ्लिक्स'ची आगामी वेब सीरिज 'त्रिभुवन मिश्रा : सीए टॉपर'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

4/10

Tillotama Shome Sexual Harassment

'नेटफ्लिक्स'ची आगामी वेब सीरिज 'त्रिभुवन मिश्रा : सीए टॉपर' या वेब सिरीजच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिलोत्तमाने तिच्याबरोबर घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. दिल्लीमध्ये आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा तिलोत्तमाने केला आहे. 

5/10

Tillotama Shome Sexual Harassment

नेमकं काय घडलं याबद्दल बोलताना तिलोत्तमाने, "हिवाळ्याचे दिवस होते. संध्याकाळ संपून रात्र होत होती. मी एका बस स्टॉपवर थांबून बसची वाट पाहत होते. त्यावेळेस अचानक तिथे एक कार आली," असं सांगितलं.

6/10

Tillotama Shome Sexual Harassment

"बस स्टॉपवर आलेल्या या कारमधून सहा तरुण खाली उतरले. मला त्यांना पाहून अस्वस्थ वाटू लागलं. मी त्यांच्यापासून थोडी दूर जाऊन उभी राहिले. त्यानंतर ते तरुण वेगवेगळ्या नावाने हाका मारु लागले. काहींनी तर माझ्या दिशेने दगडही फेकले," असं तिलोत्तमा म्हणाली.

7/10

Tillotama Shome Sexual Harassment

"मात्र तिथेच थांबली. त्यावेळेस तिला मेडिकलचं साईन असलेल्या एका कारने लिफ्ट देऊ केली. आरोग्य सेवा पुरवणारी कार असल्याने आपण त्यामध्ये सुरक्षित आहोत असं मला वाटतं. मी कारच्या फ्रंट सीटवर चालकाच्या बाजूला बसले," असं पुढील घटनाक्रम सांगताना तिलोत्तमाने म्हटलं.

8/10

Tillotama Shome Sexual Harassment

मात्र त्या कारचालकाने कार सुरु झाल्यानंतर त्याच्या पँटची चैन उघडली आणि माझा हात पकडून बळजबरीने त्याच्या गुप्तांगाला लावण्याचा प्रयत्न केला, असं तिलोत्तमाने सांगितलं. 

9/10

Tillotama Shome Sexual Harassment

घडलेल्या प्रकारेमुळे तिलोत्तमाला धक्काच बसला. एकाच वेळी तिला संताप आणि भीतीही वाटत होती. तिने चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिने आरडाओरड सुरु केल्याने चालक घाबरला आणि त्याने कार थांबवली. 

10/10

Tillotama Shome Sexual Harassment

तिलोत्तमाने संधीचा फायदा घेत कारचा दरवाजा उघडून तिथून पळ काढण्याचं सांगितलं. ही घटना फारच धक्कादायक आणि महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार अधोरेखित करणारी होती. महिलांना अधिक सुरक्षा आणि न्याय मिळवून देण्याची गरज असल्याचंही तिलोत्तमा म्हणाली.