90 च्या दशकात व्हॅनिटी व्हॅन नव्हती, अभिनेत्री कपडे कुठे बदलायच्या? करिश्मा कपूरने केला खुलासा

Entertainment : हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री करिश्मा कपूरने 90 चं दशक गाजवलं. अंदाज अपना अपना, कुली नंबर 1, राजा हिंदुस्तानी या करिश्मा कपूरच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. एका मुलीखतीत करिश्मा कपूरने 90 च्या दशकातील आठवणींना उजाळा दिला आहे.

| Aug 26, 2024, 19:52 PM IST
1/7

90 च्या दशकात व्हॅनिटी व्हॅन नव्हती, अभिनेत्री कपडे कुठे बदलायच्या? करिश्मा कपूरने केला खुलासा

2/7

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने बराच काळ गाजवणाऱ्या करीश्मा कपूरची गणना आता सीनिअर अभिनेत्रींमध्ये होते. 1991 मध्ये प्रेम कैदी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या करिश्म कपूरने 90 चं दशक गाजवलं. एकामागोमाग एक अनेक हिच चित्रपट दिले. 

3/7

बॉलिवूडची ही प्रसिद्धी अभिनेत्री सध्या एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजची भूमिका साकारताना दिसणार आहे. या कार्यक्रमानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत करीश्मा कपूरने बॉलिवूडमधल्या 90 च्या दशकातील आठवणींना उजाळा दिला. आता बॉलिवूडमध्ये बराच बदल झाल्याचं तीने सांगितलं.  

4/7

दिल तो पागल या चित्रपटावेळी पहिल्यांदा मॉनिटर पाहायला होता, त्यावेळी आम्ही खूप उत्साहित होतो, सेटवर घडणाऱ्या गोष्टी तिथल्या तिथे पाहात येत होत्या, असं करिश्मा कपूरने सांगितलं.

5/7

जुबैदा चित्रपटावेळी साईड सिंक काय असते हे आम्हाला पहिल्यांदा समजलं, लेपल माईकचाही त्यावेळी आम्ही पहिल्यांदाच वापर केला होता, त्यामुळे आम्ही भारावून गेलो होते, अशा आठवणी करिश्माने सांगितल्या.

6/7

या मुलाखतीत करिश्माने 90 च्या दशकात अभिनेत्री कपडे कुठे बदलायच्या याची आठवणही सांगितली. त्यावेळी व्हॅनिटी व्हॅन नव्हती. कपडे बदण्यासाठी झाडांच्या मागे जावं लागाचं किंवा शुटिंग ठिकाणी एखादं बाथरुम असेल तर तिथे कपडे बदलले जायचे असं सांगितलं.

7/7

करिश्मा कपूर टेरेंस लुईस आणि गीता कपूर यांच्याबरोबर इंडियाज बेस्ट डान्सर 4 या रिअॅलिटी शोची परीक्षक म्हणून काम करतेय.