'X' चा वापर फुकट करता येणार नाही;एलन मस्कचा यूजर्सला झटका

आता X वापरण्यासाठीही पैसे मोजावे लागणार आहेत. X चा वापर करण्यासाठी एलन मस्क यूजर्सकडून शुल्क आकारणार आहेत.

Sep 19, 2023, 19:43 PM IST

Elon Musk Twitter : ट्विटरचे मालक एलन मस्क जगभरातील यूजर्सना जबरदस्त झटका देणार आहेत. कारण, आता 'X' चा वापर फुकट करता येणार नाही. आता X वापरण्यासाठीही मोजावे लागणार आहेत. एलन मस्क यांनी तसे संकेत दिले आहेत. 

1/7

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) म्हणजे ट्विटर (Twitter)चे जगभरात लाखो युजर्स आहेत. या सर्व युजर्सना ट्विटरचे मालक एलन मस्क जबरदस्त झटका देणार आहेत. 

2/7

युजर्सकडून मासिक शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क किती असेल? या शुल्कानुसार युजर्सना कोणत्या सुविधा दिल्या जातील याबाबत सर्व तपशील मस्क लवकरच जाहीर करणार आहेत. 

3/7

अलिकडेच मस्क यांनी ब्ल्यू टीकबाबत मोठा निर्णय घेतला होता.  ट्विटरवर अनेक फेक अकाऊंट तयार केले जातात. यामुळे अशा प्रकारच्या अकाऊंट्सना आळा घालण्यासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

4/7

सध्या ट्विटरचे 550 दशलक्ष युजर्स आहेत. तर ट्विटरवर दैनंदिन 100 ते 200 दशलक्ष पोस्‍ट केल्‍या जातात. 

5/7

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी   एलन मस्क यांनी शुल्क लागू करण्याबाबत चर्चा केली आहे.   

6/7

आता सर्व Twitter सेवा वापरकर्त्यांसाठी मासिक शुल्क लागू करण्याचे संकेत एलन मस्क यांनी दिले आहेत.  

7/7

एलन मस्क ट्विटर विकत घेतल्‍यानंतर X नामांतरासह अनेक लोगो तसेच अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.