एलिफंटा जायचं तर आत्ताच प्लान करा नाही तर 4 महिने पहावी लागेल वाट; ठरवलं तरी जाता येणार नाही

 Elephanta Caves Gharapuri island Tourist Places : समुद्रात असलेली एलिफंटा लेणी नेमकी कुठे आहे? इथे जायचे कसे जाणून घेऊया. मुंबईतील घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या बेटावरील डोंगरात पाच लेण्या खोदलेल्या आहेत. घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने जावे लागते. साधारण एक तासाचा हा बोटीचा प्रवास आहे. एलिफंटा जायचं तर आत्ताच प्लान करा नाही तर 4 महिने वाट पहावी लागेल. 

| May 28, 2024, 10:54 AM IST
1/7

गड किल्ल्याप्रमाणेच प्राचीन लेण्या देखील महाष्ट्राच्या वैभशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत. महाष्ट्रात एक अशी लेणी जी समुद्राच्या मध्यभागी एका लहानशा बेटावरील डोंगरात कोरण्यात आली आहे.    

2/7

पावसाळ्यात चार महिने जलवाहतूक बंद ठेवण्यात येते.  1 जून पासून गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा ही बोट सेवा बंद असते.   

3/7

एलिफंटाला जाण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नाही. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटासाठी बोट सुटतात. 

4/7

एलिफंटा लेण्यांमधील प्राचीन गुहा या पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. मध्ययुगीन रॉक-कट कला आणि उत्कृष्ट वास्तुकलेचा हा एक सुंदर नमुना आहे. यामध्ये एकूण 7 गुहा आहेत. 

5/7

 साधारण 9 व्या ते 13 व्या शतकात एलिफंटा लेणीची निर्मीती झाली.  1997 साली या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला.  एलिफंटा लेणींमध्ये दगडी कोरीव शिल्पे कोरलेली आहेत. ही बौद्धकालीन आहे. तसेच या लेण्यांमध्ये प्राचीन शिवमंदिर देखील आहे.   

6/7

 महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून  6 ते 7  मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावरील डोंगरात एलिफंटा लेणीचे कोरण्यात आली आहे. 

7/7

चारही बाजुंनी समुद्राने वेढलेली ही लेणी आहे ती घारपुरी बेटावरील एलिफंटा लेणी. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत एलिफंटा लेणीचे नाव आहे.