दह्यामध्ये भाजलेले जिरे टाकून खाण्याचे 'हे' चमत्कारीक फायदे तुम्हाला माहितीयेत?

Curd and Cumin Eating Benefits: दह्याचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले जातात. मात्र नुसतंच दही न खाता त्यात जीरं मिक्स करुन खाल्याने शरीराला थंडावा मिळतो. बरेच जण जेवणासोबत दह्याचं रायता खाणं पसंत करतात, मात्र भिजवलेलं जीरं आणि दह्याचं एकत्र सेवन केलं तर अपचनाचा त्रास कमी होतो.

Jun 18, 2024, 10:46 AM IST
1/7

भिजवलेलं जीरं आणि दह्याचं एकत्र सेवन

बरेच जण जेवणासोबत दह्याचं रायता खाणं पसंत करतात, मात्र भिजवलेलं जीरं आणि दह्याचं एकत्र सेवन केलं तर अपचनाचा त्रास कमी होतो.

2/7

पचनशक्ती सुधारते

तेलकट आणि मैद्याचे पदार्थ पचायला जड असतात, त्यामुळे तुम्ही जेवणानंतर दही आणि भिजवलेलं जीरं एकत्र खाल्लं तर अन्नपचन सुरळीत होण्यास मदत होते. 

3/7

डोळ्यांसाठी फायदेशीर

सतत मोबाईल किंवा कम्युटरच्या स्क्रिनसमोर राहिल्याने याचा गंभीर परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होतो. 

4/7

व्हिटामीन ए

दही आणि जीऱ्यात व्हिटामीन ए ची मात्रा मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने  नजर दोष किंवा डोळे जळजळणं हे आजार होत नाहीत.

5/7

अ‍ॅसिडीटीवर रामबाण उपाय

वारंवार होणाऱ्या अ‍ॅसिडीटीवर दही आणि जीरं खाणं फायदेशीर ठरतं. 

6/7

मधुमेहावर फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांसाठी दही आणि जीरं खाणं हा रामबाण उपाय आहे. याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

7/7

पोट साफ होण्यास मदत

दह्यामुळे पचनसंस्था सुधारते त्यामुळे सतत पोट साफ न होण्याची समस्या होत असेल तर , आहारात दही आणि जीऱ्याचा समावेश नक्की करावा.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)