काळ्यामिरी सोबत गूळ खाल्ल्याने मिळतात 'हे' आरोग्यदायी फायदे

पावसाळ्यात अनेक प्रकारच्या समस्या वाढतात, अशा परिस्थितीत गूळ आणि काळी मिरी यांचे सेवन केल्यास अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

Aug 06, 2024, 16:31 PM IST
1/7

पावसाळ्यात अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी जागृत राहण्याची गरज आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे अशा लोकांना विशेष लक्ष देण्याची गरज या दिवसांमध्ये असते. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या लोकांना विषाणूजन्य ताप आणि सर्दी-खोकला यांसारख्या आजारांचा धोका असतो. अशा परिस्थितीत या समस्या टाळण्यासाठी काळी मिरी आणि गूळ एकत्र करून खाल्ल्याने बराच फायदा मिळतो.  गूळ आणि काळी मिरी उष्ण असल्याने अनेक गंभीर समस्या दूर होण्यास मदत होते.

2/7

सर्दी आणि खोकला

काळी मिरी आणि गूळ एकत्र करून खाल्ल्याने सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळतो. यासाठी एक ग्लास गरम पाण्यात गुळाचा तुकडा आणि चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळून प्यायल्याने काही दिवसांत आराम मिळेल.

3/7

घसादुखीपासून आराम

पावसाळ्यात घसादुखीचा त्रास वाढत असल्याने गूळ आणि काळी मिरी खूप उपयुक्त ठरू शकते. यासाठी 50 ग्रॅम गुळाची पावडर आणि 20 ग्रॅम काळी मिरी पावडर एकत्र करून हे मिश्रण कोमट पाण्यासोबत घ्या, यामुळे आराम मिळेल.

4/7

सांधेदुखीपासून आराम

गुळामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरसचे चांगले प्रमाण सांधेदुखीपासून आराम देते आणि काळ्या मिरीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म वेदना कमी करण्यास मदत करते. तसेच यामध्ये असलेले पाइपरिन नावाचे तत्व सांधेदुखीच्या रुग्णांसाठी अतिशय गुणकारी आहे.

5/7

पचन सुधारते

गूळ आणि काळी मिरी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. त्याच्या सेवनाने हायड्रोक्लोरिक ऍसिडची पातळी देखील वाढते. गूळ आणि काळी मिरी यांचे मिश्रण पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

6/7

तणाव कमी

गूळ आणि काळी मिरी तणाव आणि नैराश्यातून बरे होण्यास मदत करू शकते. काळ्या मिरीमध्ये असलेले पाइपरिन सेरोटोनिन वाढवते जे मूड सुधारण्यास मदत करते. तसेच यात वेदना कमी करणारे गुणधर्म हात आणि पाय दुखणे कमी करतात.

7/7

पीरियडस् क्रॅम्प्स

अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान शरीराला वेदना होतात. अशा परिस्थितीत गूळ आणि काळी मिरी खाल्ल्याने आराम मिळतो. किंवा चहामध्ये गूळ, काळी मिरी घालून प्यायल्याने खूप फायदा मिळू शकतो.