दिवाळी स्पशेल : घरात चिलटं, मुंग्या, झुरळं आणि पालीमुळे हैराण! 'या' 10 उपायाने करा नायनाट

Diwali 2024 Cleaning Tips : अवघ्या दोन एका आठवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे. पुढच्या सोमवार 28 ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. 28 ऑक्टोबरला वसुबारस असणार आहे. अशात लक्ष्मीला आनंदी ठेवण्यासाठी घरात साफसफाई सुरु झालीय. घरात चिलटं, मुंग्या, झुरळं आणि पालीमुळे तुम्ही हैराण असाल तर हे 10 सोपे उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतील. 

नेहा चौधरी | Oct 21, 2024, 11:57 AM IST
1/10

तुमच्या घरात उंदीर आला असेल तर त्याला घालविण्यासाठी कांद्याचे स्लाईस कापून ठेवा. कांद्याचा वासाने उंदीर घरातून पळून जाईल.   

2/10

फ्रिजची साफसफाई करायला घेतली असेल आणि त्यात वास आणि बुरशीमुळे तुम्ही बेहाल असाल तर एका बाऊलमध्ये बेकींग सोडा ठेवल्यास तुम्हाला मदत मिळेल.   

3/10

किचन ओट्यावर सतत झुरळं, मुंग्या, चिलटं येत असतील त्यांचा नायलाट लावण्यासाठी एका लहानशा वाटीत लवंग ठेवल्यास तुम्हाला फायदा होईल.   

4/10

डासांचा नायनाट करण्यासाठी घरात कडुलिंबाची पानं जाळा. 

5/10

घरात पाल आली असेल तर पाण्यात मिरपूड घालून त्याचे पाणी स्प्रे करा. 

6/10

माश्यांचा बंदोबस्त करण्यासाठी घरात कापूर जाळल्याने फायदा मिळेल.

7/10

पाण्यात तमालपत्र, दालचिनी आणि बोरीक अॅसिड मिसळावे. हे पाणी एका स्प्रे बाटलीमध्ये भरुन ते ठिकठिकाणी स्प्रे करावे. यामुळे घरातील झुरळांचा नायनाट होतो. 

8/10

ओट्यावर, सिंकपाशी किंवा घरात कुठेही सतत मुंग्या होत असतील तर जिथे मुंग्या होतात तिथे हळद पसरावी, मुंग्या निघून जातील. 

9/10

एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालायचे. हे पाणी कोपऱ्यांमध्ये स्प्रे करायचे त्यामुळे कोळी जाळे नाहीशी होतात. 

10/10

फळं ज्या बास्केटमध्ये ठेवली आहेत त्या बास्केटला बाजुने व्हिनेगर लावल्यास किटकांपासून त्याचं संरक्षण होईल.