पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार

24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया. 

| Jun 21, 2024, 23:21 PM IST

Earth Day Hours Science : पृथ्वीवर सध्या 24 तासांचा एक दिवस असतो. कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वी प्रचंड वेगाने फिरत होती. त्यावेळी एक दिवस 19 तासांचा होता. यानंतर  अनेक दशलक्ष वर्षांत पृथ्वीच्या फिरण्याचा वेग मंदावत गेला आणि दिवसाचे तास वाढत गेले. आता यात आखी वाढ होणार आहे. 

1/6

पृथ्वी ही सूर्याभोवती फिरता फिरता स्वत:भोवती देखील फिरत असते. यामुळेच पृथ्वीवर 24 तासांचा एक दिसत असतो. मात्र, आता हा दिवस 25 तासांचा होणार आहे. 

2/6

अहवालानुसार एका शतकात म्हणजे 100 वर्षांमध्ये 1.8 मिलीसेकंदाची वाढ होत आहे. दर 3.3 दशलक्ष वर्षांनी एक मिनिटाने वाढत आहे. 20 कोटी वर्षांनी पृथ्वीवर एक तास वाढेल. 200 दशलक्ष वर्षांनंतर पृथ्वीवर एक दिवस 24 नाही तर 25 तासांचा असले. 

3/6

पृथ्वीची फिरण्याची गती मंदावल्यामुळे पृथ्वीवर एक दिवस 24 तासांचा नाही तर 25 तासांचा होणार आहे. तर वर्षाचे दिवस ही 365 वरुन 350 होणार आहेत.

4/6

पृथ्वीची फिरण्याची गती मंदावल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.  पृथ्वीची फिरण्याची वेळ स्थिर नसल्याचे लाइव्ह सायन्सच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

5/6

दिवसाचे तास बदलल्यामुळे आता एका वर्षाचे दिवस देखील कमी होणार आहेत. परिणामी  एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार आहेत. 

6/6

पृथ्वीला स्वत: पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तासांचा कालावधी लागतो. यामुळेच एका दिवसात 24 तास असतात. मात्र, आता पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तासांचा कालावधी लागणार आहे.