तुमचे कान लहान की मोठे? अवयव सांगणार तुम्ही खरे की खोटे... Samudrik Shastra तील रहस्य समोर

Ear Shape Reveals Your Personality : शरीरातील प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे विशेष महत्त्व असते, परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीचे कान सुंदर असतात तेव्हा त्या व्यक्तीचे सौंदर्य आकर्षित होते. समुद्र शास्त्रामध्ये व्यक्तीच्या स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी व्यक्तीचे कान पाहून सांगता येतात. तुमच्या कानाचा आकार काय सांगतो ते जाणून घ्या... 

Jan 05, 2024, 13:08 PM IST

Ear Shape Reveals Your Personality News in Marathi : व्यक्तीच्या शरीरावर उपस्थित असलेल्या अवयवांचा आकार आणि रचना यावर आधारित परिणाम  दर्शविला जातो. आज आपण कानाच्या आकाराविषयी जाणून घेणार आहोत. समुद्र शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीचे कान पाहून त्याच्या स्वभावाशी आणि व्यक्तिमत्त्वाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी ओळखता येतात. कसं ते जाणून घ्या...   

 

1/7

एखाद्या व्यक्तीचे कान पाहून त्याच्या स्वभावाशी आणि व्यक्तिमत्त्वाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगता येतात. तुमच्या कानाचा आकार काय सांगतो ते जाणून घ्या.

2/7

मोठे कान

ज्या लोकांचे कान जाड असतात ते खूप निर्भय असतात. हे लोक राजकारणात चांगले नाव कमावतात. पण या लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवत येत नाही. कारण असे लोक खूप स्वार्थी असतात. हे लोक कष्ट करण्यासाठी सुद्धा आळसपणा करतात. 

3/7

लहान कान

समुद्र शास्त्रानुसार ज्या लोकांचे कान सामान्य आकारापेक्षा थोडे लहान असतात ते बलवान असतात.या लोकांवर सहज विश्वास ठेवता येतो. तसेच या लोकांना कलाक्षेत्रातही जास्त रस असतो असे मानले जाते. हे लोक व्यवसायातही भरपूर पैसा कमावतात. या लोकांना स्थलांतर करायला फार आवडतं.   

4/7

लांब कान

लांब कान असलेले लोक खूप मेहनती आणि सहनशील असतात आणि स्वभावाने खूप भावनिक असतात. त्याचे आपल्या कुटुंबावर खूप प्रेम असते. त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी कायम राहते. त्यांच्या कुशाग्र मनामुळे त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करण्याची त्यांना सवय असते. ते आपल्या जोडीदार खूप प्रेम करतात. 

5/7

रुंद कान

रुंद कान असलेले लोक जीवनात आनंदी असतात. त्यांना कष्टात यश मिळते. त्यांना क्वचितच पैशांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. हे लोक धार्मिक स्वभावाचे असतात. ते धर्मादाय कार्यात अधिक रस घेतात. तसेच असे लोक दूरदर्शी असतात.   

6/7

चिकटून असलेले कान

ज्या लोकांचे कान अंगाला चिटकून असतात ते धूर्त स्वभावाचे असू शकतात.  तसेच हे लोक बुद्धिमान आणि दूरदृष्टिचे असतात. हे लोक थोडे कमी भावनिक असतात. हे लोक भावनांनी प्रभावित होण्यापेक्षा तर्काच्या आधारे निर्णय घेतात. 

7/7

सामुद्रिक शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीचे कान पाहून त्याच्या स्वभावाशी आणि व्यक्तिमत्त्वाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी ओळखता येतात.  (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी 24 तास' याची खातरजमा करत नाही)