ड्रायफ्रूट्स पाण्यात भिजवून खावेत की दुधात? कोणती पद्धत आरोग्याला फायदेशीर

अनेकजण ड्रायफ्रूट्स खाण्याआधी पाण्यात भिजवत ठेवतात. कारण ही योग्य पद्धत आहे असं मानलं जातं.   

Shivraj Yadav | Jul 27, 2024, 19:46 PM IST

अनेकजण ड्रायफ्रूट्स खाण्याआधी पाण्यात भिजवत ठेवतात. कारण ही योग्य पद्धत आहे असं मानलं जातं. 

 

1/10

ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही.   

2/10

अनेकजण ड्रायफ्रूट्स खाण्याआधी पाण्यात भिजवत ठेवतात. कारण ही योग्य पद्धत आहे असं मानलं जातं.   

3/10

रोज मुठ भरून ड्रायफ्रूट्स खाण्याची प्रथा फार दशकांपूर्वीची आहे. यामध्ये विटॅमिन आणि प्रथिनं असतात.   

4/10

ड्रायफ्रूट्स भिजवून खाल्ल्यास ते पचण सोपं जातं, ज्यामुळे शरीर त्यातील पोषकतत्वं सहजपणे शोषून घेतं.   

5/10

तसंच ते भिजवल्याने मऊ होतात आणि खाणंही सोपं जातं. तसंच त्यांची चवही वाढते. याशिवाय भिजऊन खाल्ल्याने सुक्या मेव्याच्या गरम प्रभावामुळेही कोणतेही नुकसान होत नाही.  

6/10

पाणी सूक्या मेव्याला हायड्रेट करतं आणि त्यांची नैसर्गिक चव बाहेर आणतं. हे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे ज्यांना आपला वॉटर इनटेक वाढवायचा आहे किंवा दुधातून मिळणारी एक्स्ट्रा कॅलरी आणि फॅट टाळायचं आहे.   

7/10

आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाण्यात भिजवल्याने सुक्या मेव्यातील नैसर्गिक गुण कायम राहतात. तसंच त्यातील पोषणतत्वात बदल करेल असं काही मिसळत नाही.   

8/10

दुसरीकडे सुका मेवा दुधात भिजवल्याने वेगवेगळे फायदे होतात. दूध ड्रायफ्रूट्सला अधिक चवदार बनवतात. तसंच प्रोटीन, कॅल्शिअम आणि विटॅमिन सारखे अतिरिक्त पोषणतत्वं देतात.   

9/10

ज्या लोकांना दूध पिताना त्रास होतो किंवा ज्यांना कॅल्शिअम आणि प्रोटीनसारखी पोषणतत्वं वाढवायची आहेत त्यांच्यासाठी ड्रायफ्रूट्स दुधात मिसळून खाणं फायदेशीर आहे.   

10/10

जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर ड्रायफ्रूट्स दुधात मिसळून खाणं उत्तम पर्याय आहे. अशाने दूध आणि ड्रायफ्रूट्स दोघांचं पोषणमूल्य वाढतं आणि आरोग्याला फायदे मिळतात.