अभ्यास करताना डुलकी लागू नये म्हणून 8 उपाय

 काही सोप्या टीप्स फॉलो करुन पाल्ल्याची डुलकी घेण्याची सवय आपण सोडवू शकतो. 

| Feb 23, 2024, 16:04 PM IST

Stay Awake While Study: काही सोप्या टीप्स फॉलो करुन पाल्ल्याची डुलकी घेण्याची सवय आपण सोडवू शकतो. 

1/9

अभ्यास करताना डुलकी लागू नये म्हणून 8 उपाय

Drowsy with a book in hand How to stay Awake study tips

Stay Awake While Study: अभ्यास करायला घेतला की मुलांना डुलक्या येऊ लागतात. परीक्षा जवळ येते तसतसे हे प्रकार जास्त वाढू लागतात. अशावेळी मुलांच्या भविष्याची आपल्याला काळजी वाटू लागते. पण काही सोप्या टीप्स फॉलो करुन पाल्ल्याची डुलकी घेण्याची सवय आपण सोडवू शकतो. 

2/9

लक्ष केंद्रीत

Drowsy with a book in hand How to stay Awake study tips

सतत येणारी डुलकी घालवायची असेल तर संबंधित विषयाकडे लक्ष केंद्रीत करायला हवे.  तुम्ही विषयाचे महत्व समजून घेऊन लक्ष केंद्रीत केलात तर तासनतास तुम्ही जागे राहून तो अभ्यास करु शकता. 

3/9

अभ्यासाचं वातावरण

Drowsy with a book in hand How to stay Awake study tips

तुम्ही अभ्यास करत असलेली खोली, तिथलं वातावरण अॅक्टीव्ह ठेवा. कंटाळवाण्या वातावरणात अभ्यास होणार नाही. घरात अभ्यासावेळी झोप येत असेल तर मित्रांना घेऊन ग्रुप स्टडीकडे लक्ष द्या. वेगळ काहीतरी केल्याने मेंदू अॅक्टीव राहतो. 

4/9

अभ्यासाला कंटाळवाणं करु नका

Drowsy with a book in hand How to stay Awake study tips

एखाद्या विशिष्ट विषयाला कंटाळवाणे करुन अभ्यासाला बसू नका. विषय समजून न घेता नुसतं वाचत गेलात तर डुलक्या येतील. अशावेळी थोडं थोडं वाचून झाल्यावर त्याच्या नोट्स काढा. यामुळे तुमचा विषयाप्रतीचा कंटाळा निघून जाईल.

5/9

अभ्यासापुर्वी चांगल खा!

Drowsy with a book in hand How to stay Awake study tips

चांगला अभ्यास होण्यासाठी, अभ्यासावेळी फ्रेश वाटण्यासाठी सकाळचा नाश्ता , दुपारचं, रात्रीचं जेवण वेळेवर करा. जास्त खाणं म्हणजे झोपेला आमंत्रण देणं हे लक्षात असूद्या. 

6/9

कॅफेन पदार्थ टाळा

Drowsy with a book in hand How to stay Awake study tips

अभ्यासावेळी येणारी डुलकी टाळण्यासाठी वारंवार चहा, कॉफीसारखे पदार्थ घेणे टाळा. यामुळे थोड्या काळासाठी झोप उडेलही पण तुम्हाला याची सवय भारी पडू शकते. 

7/9

व्यायाम करा

Drowsy with a book in hand How to stay Awake study tips

दिवसा झोपण्याऐवजी अभ्यासाठी अंगाची हालचाल करा, थोडा व्यायाम करा. यामुळे कॅलरीज बर्न होतील आणि तुम्ही ताजेतवाने राहाल. व्यायाम करायचा नसेल तर खुर्चीतून उठा आणि चालायला लागा. 

8/9

साखरेपासून दूर राहा

Drowsy with a book in hand How to stay Awake study tips

अभ्यास करताना साखर आणि साखरेच्या पदार्थांपासून 2 हात लांब राहा. यामुळे तुमचे मन आणि शरीर निगेटीव्ह मूडमध्ये जाऊ शकते. अभ्यास करताना थोड्या थोड्या वेळाने पाणी प्या.

9/9

आठवण्याची सवय लावा

Drowsy with a book in hand How to stay Awake study tips

तुमचे लक्ष केंद्रीत होत नसेल तर थोडं थोडं जे अभ्यासाल ते आठवण्याचा प्रयत्न करा. हळुहळू याची सवय लावा. अभ्यासलेल्या टर्म्स, कॉन्सेप्ट आठवण्याचा प्रयत्न करा