ना टाटा ना अंबानी 'ही' व्यक्ती भारतातील पहिली अब्जाधीश, पेपरवेट म्हणून वापरायचे 100 कोटींचा हिरा
First Indian Billionaire: जेव्हा आपण देशातल्या अब्जाधीश आणि गडगंज श्रीमंत व्यक्तींबद्दल बोलतो तेव्हा पहिला विचार येतो टाटा, बिर्ला यांचा. पण तुम्हाला देशातील पहिला अब्जाधीश व्यक्ती कोण? माहित आहे का?
भारतातील सध्याचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी, रतन टाटा आणि बिर्ला या सगळ्यांबद्दल सर्वांनाच माहिती असेल, परंतु तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल माहिती आहे का? जो भारतातील पहिला सर्वात श्रीमंत अब्जाधीश होता. त्याच्याकडे स्वतःच्या हिऱ्याच्या खाणी आणि अब्जावधी किंमतीचे दागिने होते. निजाम मीर उस्मान अली खान हा जगातील धनकुबेर असून त्यांनी 1911 ते 1948 पर्यंत म्हणजे तब्बल 37 वर्षे हैदराबाद संस्थानाचा कारभार हाकला. त्यांच्याकडे हिरे, माणिक मोत्यांचे इतका अमूल्य साठा होता की, हिऱ्यांचा ते पेपरवेट सारखा वापर करत.
(फोटो सौजन्य - Mir Osman Ali Khan Wikipidia)