डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली चिमुकल्या शंभूप्रेमीची भेट

Feb 23, 2020, 13:52 PM IST
1/4

झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी सिरीयल अगदी शेवटच्या टप्प्यात आली असून या सिरीयल मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेचा भाग प्रसारित झाल्यानंतर अखंड महाराष्ट्राच्या डोळ्यात हे रूदयद्रावक दृश्य पाहून पाणी आले.   

2/4

असाच एक सांगली जिल्ह्यातील छोट्या पाच वर्षाच्या बाल शंभूप्रेमी चा ढसाढसा रडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या चिमुकल्याचा शोध घेवून मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्वतः या चिमुकल्या शंभूप्रेमी ला भेटीचे निमंत्रण पाठवलं. 

3/4

या चिमुकल्याची अमोल कोल्हे यांनी भेट घेतली. श्रीयोग माने असे या चिमुकल्या शंभूप्रेमी चे नाव असून तो मुळचा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात राहणारा आहे. 

4/4

खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी श्रीयोगची भेट घेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि बालशंभूचा ड्रेस आणि तलवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी श्रीयोगला भेट दिली.