Hartalika 2024 : हरतालिका व्रत करताना 'या' 7 चुका करु नका! अन्यथा...

भाद्रपद तृतिया तिथी म्हणजे हरतालिका व्रत 6 सप्टेंबरला साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी माता पार्वती आणि भगवान शंकराची पूजा करण्यात येते. 

Sep 05, 2024, 17:55 PM IST

भाद्रपद तृतिया तिथी म्हणजे हरतालिका व्रत 6 सप्टेंबरला साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी माता पार्वती आणि भगवान शंकराची पूजा करण्यात येते. 

1/7

शास्त्रानुसार, हरतालिकेचे व्रत निर्जळी असतं त्यामुळे यादिवशी चुकूनही पाणी किंवा अन्नाचे सेवन करू नये.

2/7

या दिवशी आळस करू नये किंवा व्रता दिवशी दुपारच्या वेळी झोपून राहू नये. उपवास करणारी महिला दिवसा झोपली तर ते शुभ मानले जात नाही.

3/7

उपवास करताना लहान-मोठे सर्वांचा आदर करा. या दिवशी कुणालाही अपशब्द वापरू नका, ज्यामुळे त्यांचे मन दुखू शकते. तसंच महिलांनी पतीशी भांडण करू नये किंवा अपशब्द वापरू नये. याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणूनबुजून किंवा नकळत कुटुंबातील कोणाशीही वाईट वागू नका.

4/7

मासिक पाळी असेल तर हरतालिकेच व्रत असाव पण देवाला लांबूनच नमस्कार करावा. 

5/7

शास्त्रानुसार जर कोणी हरतालिकेचे व्रत पाळण्यास सुरुवात केली तर त्यांनी मध्येच सोडू नये. हे देखील शुभ मानले जात नाही. दरवर्षी तुम्ही ते संपूर्ण विधीपूर्वक पूर्ण करावे.

6/7

हरतालिकेच्या व्रतादिवशी उशिरापर्यंत झोपू नये. लवकर उठून नित्यकर्म आटोपून देवाची पूजा करावी. तसेच या दिवशी अंगातील सगळा आळस झिडकारून टाकावा.

7/7

शास्त्रानुसार हरतालिकेच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका. तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि शांत असावे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)