'देतो तो देव'; सुदृढ आणि निरोगी आरोग्य देणाऱ्या डॉक्टरांना खास शुभेच्छा, अशी करा कृतज्ञता व्यक्त

1 जुलै रोजी 'राष्ट्रीय डॉक्टर डे' साजरा केला जातो. माणसातल्या देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. खास शुभेच्छा पाठवून व्यक्त करा कृतज्ञता. 

| Jul 01, 2024, 10:57 AM IST

National Doctors Day : 'डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप' म्हटले जाते. देवानंतर माणसाला दुसरे जीवन देणारे डॉक्टरच आहेत. गरजू लोकांना बरे करण्यात आणि त्यांना निरोगी ठेवण्यात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असते. कोविड महामारीच्या काळात त्यांचे योगदान अधिक अधोरेखित झाले. परंतु अनेक वेळा आपण त्यांचे आभार मानायला विसरतो. 'डॉक्टर्स डे' आम्हाला डॉक्टरांचे त्यांच्या निस्वार्थ कार्याबद्दल आभार मानण्याची संधी देतो.

'राष्ट्रीय डॉक्टर दिन' दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जातो. भारतात हा दिवस पहिल्यांदा 1991 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा करण्याचे एक खास कारण म्हणजे आज महान डॉक्टर डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी पाटणा, बिहार येथे झाला.

1/10

डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रसंगी ज्यांच्यावर हल्ले झाले तेच कोरोना संकटात आपल्यासाठी पुढे आले अशा सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार डॉक्टर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

2/10

डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

कोरोनाच्या या कठीण संकटमय काळामध्ये देवदूत ठरलेल्या सर्व डॉक्टर बंधूंना डॉक्टर दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!

3/10

डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

देवासारखे येती धावून देवासारखे करतात काम... माणसातल्या या देवाला सदैव आमचा सलाम... डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

4/10

डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

काळ वेळ न पाहता जे होतात रुग्णसेवेत रुजू सांगा डॉक्टर तुमचे उपकार कोणत्या शब्दात मोजू डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

5/10

डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

रुग्णसेवेचे ज्यांनी अंखड व्रत हाती घेतले असे डॉक्टरांच्या रुपातील देव आम्हास भेटले डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

6/10

डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्यावर आलेले विघ्न हरणारे चालते बोलते ईश्वर म्हणजे डॉक्टर सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

7/10

डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

रुग्णांच्या हाकेला दिली ज्यांनी साद ज्यांच्यासमोर उभं राहायची रोगाची नाही बिशाद अशा सर्व डॉक्टरांना आज मनापासून धन्यवाद... डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

8/10

डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

डॉक्टरांनी आपल्या आयुष्यात आरोग्याचा आनंद आणल्यानेच हे जग राहण्यासाठी उत्तम व आरोग्यदायी स्थान बनले आहे डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

9/10

डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या कर्तव्याची जाण ठेवून रात्रंदिवस करतात रुग्णसेवा अशा या कर्तव्यनिष्ठ डॉक्टरांचा साऱ्या जगालाच वाटतो हेवा डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

10/10

डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

रुग्णांना बरे करणे हा एकच ध्यास अशा डॉक्टरांसाठी सर्वांनी मिळून आजचा दिवस करुया खास डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!