भाज्यांची सालं, टरफलं काढून शिजवताय? हीच चूक महागात पडेल

Vegetables Skin Benefits : अनेक भाज्या अशा आहेत ज्याची साल न काढता तुम्ही ती तशीच शिजवली तर त्यामधून सर्वाधिक पोषकतत्त्वे आणि जीवनसत्त्वे मिळू शकतात. 

| Dec 07, 2023, 17:27 PM IST

vegetable skin you can eat: भाज्यांचा समावेश हेल्दी डाएटमध्ये येतो. ऍक्टिव आणि हेल्दी राहण्यासाठी भाजी खाणे अत्यंत गरजेचे असते. निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी भाजीचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. भाजीचा आहारात समावेश करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात. जसे की, भाजी सर्वात आधी धुवून घेतली जाते त्यानंतर त्याची साल किंव टरफलं काढून ती शिजवली जाते, ही भाजी बनवण्याची सामान्य पद्धत आहे. कारण काही भाज्या सालीसकट खाणे फायदेशीर ठरतात. आपण अशाच काही भाज्या पाहणार आहोत. 

1/7

भोपळा

Do Yo Peel Vegetables and Cook its Harmful for Health Know Benefits of Vegetables Skin

भोपळा ही भाजी प्रत्येकालाच आवडेल अशी नाही. पण ही भाजी चवीने खाणारे लोक साल काढून ही भाजी शिजवतात. कारण साल अतिशय कठिण आणि जाड असते. जी शिजायला खूप वेळ लागतो. पण महत्त्वाचं म्हणजे लोह, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळतात. 

2/7

गाजर

Do Yo Peel Vegetables and Cook its Harmful for Health Know Benefits of Vegetables Skin

गाजर खाताना अनेकदा त्याची साल काढली जाते. मात्र गाजराची साल सर्वाधिक गुणकारी असते. गाजर हे एक कंदमुळ आहे. ज्यामुळे ते सालासकट खाणे अत्यंत गरजेचे असते. 

3/7

बटाटा

Do Yo Peel Vegetables and Cook its Harmful for Health Know Benefits of Vegetables Skin

बटाटा प्रत्येक घरात खाल्ला जातो आणि असे दिसून आले आहे की, बहुतेक लोक बटाट्याची साल काढून टाकतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की बटाट्याची साल देखील खूप फायदेशीर आहे. बटाट्याच्या सालीमध्ये सुमारे 20 टक्के पोषक घटक आढळतात, ज्यामध्ये व्हिटॅमिन बी इ. बटाटे चांगले धुवा आणि नंतर ते उकळवा.  

4/7

बीट

Do Yo Peel Vegetables and Cook its Harmful for Health Know Benefits of Vegetables Skin

बीट ही एक भाजी आहे जी कच्ची आणि शिजवून दोन्ही खाऊ शकते. पण अनेकांना बीटरूट सोलल्यानंतर खायला आवडते, ज्याची गरज नसते. बीटरूटच्या भाजीमध्ये जीवनसत्त्वांसह अनेक पोषक घटक आढळतात, जे तुमच्या त्वचेसाठी आणि शरीराच्या इतर अवयवांसाठी खूप फायदेशीर असतात.

5/7

रताळं

Do Yo Peel Vegetables and Cook its Harmful for Health Know Benefits of Vegetables Skin

अनेकजण रताळं भाजून किंवा शिजवून खातात. पण प्रत्येकजण रताळ्याची साल काढून खातात. पण रताळं हे कंदमुळ असून यामध्ये खूप जीवनसत्त्व आहे. जसे की, फायबर, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमीन सी, ई, फोलेट, पोटॅशियम आणि लोह यांसारखे पोषकतत्त्व असतात. ज्यामुळे शरीर अधिक मजबूत होते. 

6/7

काकडी

Do Yo Peel Vegetables and Cook its Harmful for Health Know Benefits of Vegetables Skin

काकडीच्या फायद्यांबद्दल तुम्हाला माहिती असेलच, पण तुम्हाला माहिती आहे का की काकडीच्या सालीसोबत खाणे आणखी फायदेशीर आहे. काकडीच्या सालीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन ए आढळतात, ज्यामुळे त्यातील पोषक घटकांचे प्रमाण वाढते. मात्र ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांना काकडीची साल पचायला थोडं कठीण जातं. त्याच वेळी, काकडी खाण्यापूर्वी ती सालासह पूर्णपणे धुणे खूप महत्वाचे आहे.

7/7

टोमॅटो

Do Yo Peel Vegetables and Cook its Harmful for Health Know Benefits of Vegetables Skin

काहीजण टोमॅटोची साल जेवताना काढतात. किंवा काहीजण साल काढून टोमॅटो भाजी किंवा आमटीत घालतात. पण अशापद्धतीने टोमॅटोचा आहारात समावेश करणे चुकीचे आहे. टोमॅटोच्या सालीमध्ये फ्लेव्होनॉइड नॅरिन्जेनिनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे जळजळ कमी होते आणि काही प्रकारच्या रोगांपासून संरक्षण होते.