Diabetes in Summer : संपूर्ण उन्हाळा Diabetes कंट्रोलमध्ये ठेवायचाय? मग ही 10 कामे कराच

Summer Foods : मुंबई आणि महाराष्ट्रात उन्हाळा सुरु झाला. अशावेळी आरोग्याच्या समस्या डोकंवर करतात. अशावेळी सुरुवातीपासूनच आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. मधुमेही रुग्णांनी 10 टिप्स न चुकता फॉलो कराव्यात. 

| Mar 21, 2024, 12:47 PM IST

Summer Health Tips in Marathi : उन्हाळा सुरु झाला की, अनेकांना त्रास होतो. अचानक वातावरण बदलाचा परिणाम शरीरावर मोठ्या प्रमाणावर होत असतो. अशावेळी मधुमेही रुग्णांचे आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे ठरते. उन्हाळ्यात साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे थोडे कठीण असते. जसजसे उष्णता वाढते तसतसे तुमच्या सवयी देखील बदलतात, ज्यामुळे साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. मधुमेह ही अशी स्थिती आहे जी योग्य खाणे आणि व्यायाम करून नियंत्रित केली जाऊ शकते. अशावेळी तज्ज्ञांनी सांगितलेल्या 10 गोष्टी अगदी उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच फॉलो करणे गरजेचे आहे. 

1/10

भरपूर पाणी प्या

10 Easy Tips in Summer

उन्हाळ्यात दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी पिणे खूप गरजेचे आहे. डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकते आणि अनेक समस्या निर्माण करू शकतात.

2/10

हलका आहार घ्या

10 Easy Tips in Summer

उन्हाळ्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. त्याऐवजी हलका, ताजा आणि फायबरयुक्त आहार घ्या. ताजी फळे आणि भाज्या, पातळ प्रथिने आणि संपूर्ण धान्य खाल्ल्याने साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.

3/10

रक्तातील साखरेची पातळी तपासत राहा

10 Easy Tips in Summer

तुमच्या रक्तातील साखरेची नियमित तपासणी करा. उन्हाळ्यात शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होऊ शकते, ज्यामुळे साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही तुमच्या औषधांचे किंवा इन्सुलिनचे प्रमाण बदलू शकता.  

4/10

औषधांची काळजी घ्या

10 Easy Tips in Summer

तुमची मधुमेहाची औषधे आणि इन्सुलिन थेट सूर्यप्रकाश आणि अति उष्णतेपासून दूर ठेवा. उष्णतेमुळे या औषधांची ताकद कमी होऊ शकते. प्रवास करताना त्यांना थंड आणि कोरड्या जागी ठेवा किंवा थंड पिशवीत ठेवा. तसेच पाण्याची बॉटल देखील ठेवा. 

5/10

सूर्यप्रकाश टाळा

10 Easy Tips in Summer

बाहेर जाताना सूर्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन, संरक्षक कपडे आणि टोपी घाला. सूर्यप्रकाशामुळे त्वचा जळू शकते, ज्यामुळे शरीरावर ताण येतो आणि रक्तातील साखरेवरही परिणाम होऊ शकतो.

6/10

सक्रिय रहा

10 Easy Tips in Summer

नियमित व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे, परंतु उन्हाळ्यात व्यायाम करताना काळजी घ्या. खूप गरम नसताना व्यायाम करा, जसे की सकाळी लवकर किंवा संध्याकाळी. तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवा आणि व्यायामापूर्वी, दरम्यान आणि नंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासत राहा.

7/10

या गोष्टी जवळ ठेवा

10 Easy Tips in Summer

जर तुम्ही बाहेर फिरायला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला जात असाल तर त्यासाठी अगोदर तयारी करा. तुमच्यासोबत पाणी, नाश्ता आणि मधुमेहाच्या आवश्यक गोष्टी सोबत ठेवा. रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यासाठी, लो-कार्ब आणि सहज कॅरी करण्याजोगे स्नॅक्स जसे की सुकामेवा, बिया किंवा चीज ठेवू शकता.

8/10

अल्कोहोलचा वापर कमी करा

10 Easy Tips in Summer

अल्कोहोल रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यास कारणीभूत ठरु शकतं. एवढंच नव्हे तर उपाशीपोटी ड्रिंक्स केल्याने त्याचा अधिक परिणाम होतो.  जर तुम्हाला अल्कोहोल पिण्याची इच्छा असेल, तर कमी प्रमाणात प्या आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी जेवण करा.

9/10

इमर्जन्सी किट, नंबर जवळ ठेवा

10 Easy Tips in Summer

तुमच्यासोबत नेहमी डायबिटीज इमर्जन्सी किट ठेवा. विशेष करुन प्रवास करताना किंवा घराबाहेर बराच वेळ घालवताना. या किटमध्ये ग्लुकोजच्या गोळ्या किंवा जेल, ग्लुकागन इंजेक्शन किट आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक ठेवा.

10/10

वैद्यकीय सल्ला घ्या

10 Easy Tips in Summer

जर तुम्हाला उन्हाळ्यात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात काही अडचण येत असेल किंवा शरीरात काही असामान्य लक्षणे दिसत असतील तर नक्कीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. थोडासा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो.