PHOTO: यंदाच्या दिवाळीत तेलाने नाही तर पाण्याने पेटवा दिवे, घरच्या घरी कसे बनवायचे?

Water Diya on Diwali 2024 : दिवाळी हा दिव्यांचा सण असून यानिमित्ताने घरात आणि अंगणात दिव्यांची आरास केली जाते. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. दिवाळीचे ५ दिवस दिवे पेटवण्यासाठी भरपूर तेल वापरलं जातं. तेव्हा यावेळी तुम्हाला पाण्यावर पटणारे दिवे घरच्या घरी कसे बनवायचे याच्या सोप्या टिप्स सांगणार आहोत. 

| Oct 28, 2024, 16:50 PM IST
1/8

बाजारात पाण्यावर पेटणारे दिवे उपलब्ध आहेत. मात्र हे दिवे आर्टिफिशिअल असून यात लाइट आणि सेन्सर असतो. ज्यामुळे पाणी टाकताच या सेन्सरमुळे लाइट पेटते. मात्र हे दिवे महाग मिळतात. तेव्हा घरीच पाण्यावर पटणारे दिवे कसे बनवायचे हे जाणून घेऊयात.

2/8

Bhavna Cooking World या यूट्यूब चॅनलवर पाण्यावर पेटणाऱ्या दिव्यांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलेला आहे. यानुसार कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही पाण्यावर पटणारे दिवे कसे बनवू शकतात याविषयी सांगण्यात आलंय.  

3/8

व्हिडीओमध्ये दाखवल्यानुसार सर्वप्रथम बाजारातून मातीचे दिवे विकत घ्या. मग हे दिवे 1 तास पाण्यात भिजवून ठेवा. जास्त वेळ नसल्यास तुम्ही 15 मिनिट देखील दिवे पाण्यात भिजवून ठेऊ शकता. 

4/8

दिव्यातील वाती तयार करण्यासाठी तुम्ही कापूस आणि दुधाचा वापर करा. थेंबभर दुध वापरून तुम्ही घट्ट वाती तयार करून घ्या. पाण्यात भिजवत ठेवलेले दिवे बाहेर कडून थोडावेळ वाळायला ठेवा आणि मग पुसून वापरायला घ्या. 

5/8

सर्व दिवे एकत्र करून त्यात पाणी भरा. लक्षात ठेवा पाणी दिव्याच्या काठोकाठ भरायचे नाही, दिव्याच्या कडा आणि पाण्याच्या पातळीत थोड अंतर असू द्यात.  

6/8

दिव्यांमध्ये पाणी भरल्यावर प्रत्येक दिव्यात एक लहान चमचा तेल टाका. पाण्यावर तेलाचा तवंग येईल मग व्हिडीओमध्ये दाखवल्यानुसार या तेलावर वात ठेवा आणि वातीला पाणी लागणार नाही याची काळजी घ्या. 

7/8

दिव्यात तेल टाकल्यावर तो जास्त हलणार नाही याची काळजी घ्या आणि मग वाती पेटवा. अशा पद्धतीने हे दिवे लावल्यास कमीत कमी तेलात जास्त वेळ दिवे पेटतील. एकदा पाण्यावर लावलेले हे दिवे जवळपास एक ते दीड तास जळत राहतात. 

8/8

(इथं दिलेली माहिती ही व्हिडीओच्या आधारावर देण्यात आली असून ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. वरील दिलेल्या पद्धतीनुसार दिवे पेटवताना व्यक्तींनी काळजी घ्यावी. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)