PHOTO : पायलट पतीला घटस्फोट, धर्म बदलून अभिनेत्याशी लग्न; टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होताच सोडली इंडस्ट्री

Entertainment : टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी ही अभिनेत्री बिग बॉसमधून 2 कोटी 55 लाखांची कमाई करुन गेली. ती दर आठवड्याला सुमारे 15 लाख रुपये मानधन घ्यायची, पण आता लग्नानंतर ती इंडस्ट्रीतून गायब झालीय.

नेहा चौधरी | Aug 06, 2024, 08:27 AM IST
1/7

एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे जी एकेकाळी प्रत्येक घराघरात प्रिय होती, पण आता तिने लग्न केल्यानंतर स्वतःला अभिनयापासून दूर केलं असून घर आणि मुलांचा सांभाळ करतेय. 

2/7

आज या अभिनेत्रीचा वाढदिवस असून ती 38 वर्षांची झालीय. आम्ही बोलत आहोत दीपिका कक्कर हिचाबद्दल. हिचं वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत असतं. 

3/7

फार कमी लोकांना माहितीय की, अभिनेत्री होण्यापूर्वी दीपिकाने एअर होस्टेस म्हणून काम करायची. जेट एअरवेजमध्ये सुमारे 3 वर्षे तिने काम केलंय. मात्र, नंतर प्रकृतीच्या समस्येमुळे त्यांनी नोकरी सोडली आणि टीव्हीच्या दुनियेत हात आजमावला. 

4/7

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका जेट एअरवेजमध्ये काम करत असताना तिची भेट पायलट रौनक सॅमसनशी झाली. नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दीपिकाचं पहिलं लग्न 2011 मध्ये रौनकसोबत झालं होतं. मात्र, हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि 2015 मध्ये दोघे वेगळे झालं.

5/7

तिला अनेक वेळा ट्रोलिंगला सामोरे जावं लागलं. दीपिका जेव्हा इंडस्ट्रीत आली तिचं लग्न झालं होतं. 'ससुराल सिमर का'च्या सेटवर तिची आणि शोएब इब्राहिमची भेट झाली आणि त्यानंतर त्यांच्या अफेयरच्या बातम्यांनी जोर धरला. हेच कारण तिचं पहिलं लग्न मोडण्यामागे असल्याच बोलं जातं. 

6/7

मात्र, दोघांमध्ये धर्माची भिंत होती.शोएबशी लग्न करण्यासाठी तिने धर्म बदलला. शोएबसाठी तिने समाज आणि कुटुंब दोघांशीही संघर्ष केला. 2018 मध्ये शोएबशी लग्न करण्यासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्याच्याशी लग्न केलं. 

7/7

2018 मध्ये दीपिकाने शोएबसोबत लग्न केलं होतं. त्याच वर्षी ती बिग बॉस 12 ची विजेतीही ठरली. बिग बॉस ट्रॉफी जिंकल्यानंतर ती पहिल्यांदा अजमेर शरीफला गेली. त्यावेळी पती शोएबने तिचे फोटो शेअर करून चाहत्यांना माहिती दिली. अजमेरला गेल्यावर ती खूप ट्रोल झाली. मात्र, अजमेरहून परतल्यावर तिने मुंबईतील एका मंदिरात पतीसोबतचा फोटो शेअर करून या वादाला पुन्हा खतपाणी घातलं.