Ashadhi Ekadashi 2024 : उपवास करायचा आहे, पण अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो? मग काय खावे काय टाळावे जाणून घ्या

Ashaadhi Ekadashi Fasting Tips : आषाढी एकादशीच्या उपवसाला अतिशय महत्त्व आहे. पण उपवासाच्या पदार्थांचं सेवन केल्यास अ‍ॅसिडिटी, डोके दुखीचा त्रास होतो. मग यंदा उपवास करा बिनधास्त, कारण काय खावं आणि काय टाळावं याबद्दल आम्ही सांगणार आहोत. 

नेहा चौधरी | Jul 13, 2024, 16:25 PM IST
1/8

आषाढी एकादशीचा उपवास हा पावसाळ्यात येतो. यंदा आषाढी एकादशी 17 जुलै 2024 ला असणार आहे. पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते. अशात उपवासाचे पदार्थ खाल्ल्यास अ‍ॅसिडिटी, डोके दुखीचा किंवा गॅसेसची समस्या होते. ही समस्या टाळण्यासाठी तुम्हाला जिभेचे चोचले विसरावे लागतील आणि उपवासाचे काही नियम पाळल्यास उपवासातून फायदाच मिळेल. 

2/8

साबुदाणा खिचडी, वडे, पापड्या; बटाटा चिप्स, केळ्याचे चिप्स असे तळलेले पदार्थ पावसाळ्यात पचायला जड असता. शिवाय या पदार्थांमुळे वजन आणि कोलेस्टेरॉलदेखील वाढत. गोड पदार्थही या दिवशी जास्त खाल्ले पचनक्रियेवर ताण येतो. 

3/8

त्यामुळे आषाढी एकादशीला तुम्ही राजगिरा पिठाची भाकरी, लाल भोपळा, भेंडी, काकडी, सुरण, रताळी हे खाऊ शकता. 

4/8

वऱ्याचे तांदूळ किंवा थालीपीठ केले तरी त्यातही बटाट्याबरोबर काकडी, भोपळा, रताळी, सूरण घालून केल्यास तुम्हाला फायदा मिळेल. भगरीसोबत आपण दाण्याची आमटी करतो, त्याऐवजी शिंगाड्याची कढी किंवा आमसूलाचे सार किंवा साधं ताक घेतल्यास गॅस किंवा पित्ताचा त्रास होत नाही. 

5/8

रिकाम्या पोटी सकाळी नाश्ताच अनेक जण गरमागरम साबुदाणा खिचडी खातात. सोबत चहा किंवा कॉफीची जोड. असं न करता उकडलेलं रताळं आणि दूध, राजगिऱ्याच्या लाह्या आणि दूध किंवा दही घ्यावे.   

6/8

फळं एरवीही आहारात असायलाच हवीत. मात्र उपवासाच्या दिवशी किमान फळांच्या सेवनावर अधिक भर द्यावा.   

7/8

उपवासाच्या दिवशी पाणी भरपूर प्यावे. त्यासोबत तुम्ही ताक, कोकम सरबत, लिंबू पाणी, शहाळं पाणी आवर्जून प्यायला हवं. 

8/8

तुम्ही कामावर असाल तर अधूनमधून तुम्ही राजगिरा वडी, लाडू, मनुका, खजूर, ड्रायफूट खाऊ शकता.