Movie Release: भारतात चित्रपट शुक्रवारीच का प्रदर्शित होतात? तुम्हाला यामागील खास कारण माहितीये का?

Why Movies Released On Friday: तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे की नाही ठाऊक नाही. मात्र भारताबरोबरच जगभरातील अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणारे बहुतांशी चित्रपट हे शुक्रवारीच प्रदर्शित होतात. भारतातही फ्रायडे ब्लॉकबस्टरसारखे प्रकार फारच प्रचलित होण्यामागील कारण हे चित्रपट शुक्रवारीच प्रदर्शित केले जातात. पण अनेक चित्रपट आठवड्यातील याच दिवशी का प्रदर्शित केले जातात तुम्हाला माहितीये का?

May 26, 2023, 14:37 PM IST
1/9

Did you know why movies released on friday

भारतामधील बहुतांश चित्रपट हे शुक्रवारीच का प्रदर्शित होतात असा प्रश्न तुम्हालाही कधी पडला आहे का? अर्थात याबद्दल तुम्ही कधी विचार केला नसेल तर हा प्रश्न आता तुम्हाला हे वाक्य वाचून नक्कीच पडला असणार. तर या प्रश्नाचं उत्तर फारच रंजक आहे. शुक्रवारीच चित्रपट का प्रदर्शित होतात याबद्दल जाणून घेऊयात...

2/9

Did you know why movies released on friday

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या म्हणण्यानुसार, 'शुक्रवार हा कदाचित सर्वात चांगला दिवस आहे.' शुक्रवार हा आठवड्यातील सर्वात आवडता दिवस असतो. यामागील मूळ कारण म्हणजे शुक्रवारीच विकेण्ड सुरु होतो म्हणून बरेच लोक या दिवसाची वाट पाहत असतात. 

3/9

Did you know why movies released on friday

लोक आतुरतेनं शुक्रवारची वाट पाहत असल्यानेच चित्रपट निर्मातेही याच दिवशी चित्रपट प्रदर्शित करतात का? हा चर्चेचा विषय ठरु शकतो. मात्र अन्य एका लॉजिकनुसार याचा संबंध थेट हॉलिवूडशी लावला जातो.

4/9

Did you know why movies released on friday

सर्वात आदी 15 डिसेंबर 1939 रोजी हॉलिवूडमधील चित्रपट 'गॉन विथ द विंड' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने तिकीटबारीवर दमदार कामगिरी केली होती. तेव्हापासूनच शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात झाली असं सांगितलं जातं.

5/9

Did you know why movies released on friday

भारताबद्दल बोलायचं झाल्यास 1960 पर्यंत चित्रपट प्रदर्शित करण्याचा असा काही दिवस ठरलेला नव्हता. भारतामधील पहिला बॉलिवूड चित्रपट जो शुक्रवारी रिलीज झाला तो होता, 'मुगल-ए-आजम.' हा चित्रपट 5 ऑगस्ट 1960 रोजी प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

6/9

Did you know why movies released on friday

'मुगल-ए-आजम' हा फारच यशस्वी चित्रपट ठरला. कमाईपासून ते अभिनयापर्यंत सर्वच बाबतीत हा चित्रपट सरस ठरला. हा चित्रपट आजही हिंदी चित्रपटसृष्टीमधील एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो.

7/9

Did you know why movies released on friday

'मुगल-ए-आजम'च्या प्रदर्शनानंतरच भारतीय चित्रपटसृष्टीनेही हॉलिवूडप्रमाणे शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस असल्याने हा धनलाभाचा दिवस असतो असाही विचार करुन शुक्रवारी निर्माते चित्रपट प्रदर्शित करु लागल्याचे सांगितलं जातं.

8/9

Did you know why movies released on friday

मात्र मागील काही काळापासून शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेण्ड बदलताना दिसत आहे. 'राम सेतू' आणि 'थँक गॉड'सारखे चित्रपट मंगळवारी प्रदर्शित झालेत.

9/9

Did you know why movies released on friday

अगदी शाहरुख खानचा विक्रमी कमाई करणारा 'पठान' चित्रपटही बुधवारी प्रदर्शित झाला.