कायम लक्षात ठेवा नीम करोली बाबा यांचे 'हे' गुरुमंत्र; यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही

Neem Karoli Baba Success Mantara : भक्तांना त्यांच्या आयुष्यातील पडत्या काळात आधार देण्यापासून आनंदाच्या काळात त्यांच्या पाठीवर शाबासकी देण्यासाठी गुरु कायम पुढे राहिले. यातलंच एक नाव म्हणजे नीम करोली बाबा. 

May 26, 2023, 11:43 AM IST

Neem Karoli Baba Success Mantara : अध्यात्मिक गुरुंची परंपरा भारताला लाभली आहे. या देशात आजवर अनेक असे गुरु झाले ज्यांनी त्यांच्या हजारो, लाखो भक्तांना जगण्याची योग्य दिशा दाखवली

1/7

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली

neem karoli baba mantars and guidence for success

देशोदेशीच्या भाविकांसाठी श्रद्धास्थानी असणाऱ्या या नीम करोली बाबांनी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या जीवनातही महत्त्वपूर्ण स्थान मिळवलं. त्यांच्यापुढं ही जोडी कायमच नतमस्तक होताना दिसते.   

2/7

उत्तराखंड

neem karoli baba mantars and guidence for success

उत्तराखंडमधील कैंची धाम येथे अवतारपुरुष नीम करोली बाबा यांचा आश्रम आहे. जिथं दरवर्षी अनेक भाविक भेट देतात. इथं येऊन ध्यानधारणा करत बाबांनी सांगितलेल्या उपदेशांचं पालन करतात. तुम्हीही त्यांच्या गुरुमंत्राच्या आधारे जीवनातील ध्येय्य गाठू शकता. 

3/7

दान आणि पुण्य

neem karoli baba mantars and guidence for success

अध्यात्मावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा कल दान करण्याकडे असतो. पण, काही मंडळी दान तर करतात पुढच्याच क्षणाला त्याची चर्चाही करतात. पण, नीम करोली बाबा यांच्या उपदेशानुसार हे मुळीच योग्य नाही. कारण दान केल्याचं स्वत:च इतरांना सांगितल्यामुळं त्याचा सकारात्मक परिणाम होत नाही.   

4/7

मिळकत कोणालाही सांगू नका

neem karoli baba mantars and guidence for success

महाराजजींच्या सांगण्यानुसार कोणत्याही व्यक्तीनं कधीच त्याच्या मिळकतीबाबच चर्चा करु नये. इतरांना आपली मिळकत सांगितल्यास समोरचा व्यक्ती तुम्हाला त्या नजरेतून पाहण्यास सुरुवात करतो. अनेकांची नकारात्मक उर्जाही इथं प्रभाव पाडते. 

5/7

भूतकाळ

neem karoli baba mantars and guidence for success

नीम करोली बाबा यांच्या सांगण्यानुसार कोणत्याही व्यक्तीनं त्याचा भूतकाळ विसरलं पाहिजे. असं केल्यामुळं भविष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन मिळतो. शिवाय भूतकाळातील कडू आठवणी तुमचा वर्तमानही बिघडवू शकतात. त्यामुळं त्यातून योग्य शिकवण घेऊन पुढच्या टप्प्यावर यावं. 

6/7

कमकुवत बाजू

neem karoli baba mantars and guidence for success

मनुष्य म्हटलं की त्याच्या व्यक्तीमत्त्वाची कमकुवत बाजूही आलीच. पण, कधीही कोणत्याही व्यक्तीनं आपली कमकुवत बाजू इतरांसमोर उघड करू नये अशी शिकवण नीम करोली बाबा देतात असं त्यांच्या अनुयायांचं मत. बऱ्याचदा अनावधानानं कमकुवत बाजू शत्रुपुढे बोलून दाखवल्यास ते याचा दुरुपयोग करतात. 

7/7

दैनंदिन जीवनातील उदाहरणं

neem karoli baba mantars and guidence for success

नीम करोली बाबांनी कायमच त्यांच्या अनुयायांना दैनंदिन जीवनातील उदाहरणं देत त्यांना अध्यात्मिक विश्वाची सफर घडवली. स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, जुलिया ऱॉबर्ट्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सेलिब्रिटींसाठीसुद्धा ते श्रद्धास्थानी आहेत.