सिमेंटला मराठीत काय म्हणतात? योग्य उत्तर एकालाही जमलेलं नाही

असाच एक प्रश्न आणि त्याच्या उत्तराविषयी इथं जाणून घेऊया. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करताय का? बघा जमतंय का... 

Nov 14, 2024, 11:57 AM IST

दैनंदिन जीवनात काही असे प्रश्न मनात घर करून जातात, की डोकं विचारातच गुतून जातं. 

1/7

इंग्रजी शब्द...

Did you know what is cement called in marathi

कळत नकळत दर दिवशी कितीही मराठीच बोलायचं म्हटलं तरीही काही इंग्रजी शब्द आपण ओघाओघानं बोलून जातो आणि ते लक्षातही येत नाही. 

2/7

उच्चार

Did you know what is cement called in marathi

बरं, ज्या इंग्रजी शब्दांचा आपण उच्चार केला, त्यांना मराठीत काय म्हणतात? असं विचारलं की सर्वांच्याच चेहऱ्य़ावर एक भलंमोठं प्रश्नचिन्हं उभं राहतं. 

3/7

गोंधळात टाकणारा प्रश्न

Did you know what is cement called in marathi

असाच एक गोंधळात टाकणारा प्रश्न आणि त्याचं उत्तर शोधूया... सिमेंटला मराठीत काय म्हणतात? माहितीये का तुम्हाला? 

4/7

सिमेंट

Did you know what is cement called in marathi

घर, ऑफिस किंवा अगदी रस्त्यावरून चालतानासुद्धा या सिमेंट या शब्दाचा वापर आपण करतो. सिमेंट उडतंय, सिंमेंटचे रस्ते, सिमेंटचं बांधकाम, सिमेंटचं जंगल या आणि अशा अनेक संदर्भांमध्ये सिमेंट ही एक गोष्ट कायम आहे. 

5/7

धक्का

Did you know what is cement called in marathi

तुम्ही स्वत: हा शब्द नेमका कितीवेळा उच्चारला आहे, या गणिताची उकल होते तेव्हाही धक्काच बसतो ना? याच सिमेंटला मराठीत काय शब्द आहे ठाऊक आहे? 

6/7

चुनखडी

Did you know what is cement called in marathi

बांधकामासाठी वापरात येणारं सिमेंट प्रामुख्यानं चुनखडीपासून तयार केलेलं असतं. विटांमध्ये साधारण ओलसर करून वापरल्या जाणाऱ्या या मिश्रणामुळं बांधकामाला एक भक्कमपणा मिळतो. 

7/7

तो शब्द आहे...

Did you know what is cement called in marathi

सिमेंटला मराठीत वज्रचूर्ण असं म्हणतात. शासकीय व्यवहारामध्ये, परिपत्रकांमध्ये सहसा या शब्दाचा वापर केल्याचं आढळतं. राहील ना हा शब्द लक्षात?