महाराष्ट्रातील 'या' गावात कोणी लग्नच करत नाही! कारण फारच रंजक; इथं एकाही घरात...

Mysterious Village In Maharashtra: तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल, तुम्ही लहानाचे मोठे इथेच झाला असला तरी तुम्हाला या गावाबद्दल माहित असण्याची शक्यता फारच कमी आहे. नेमकं असं काय आहे या गावामध्ये तेथील अनेक रहस्यांबद्दल जाणून घेऊयात...

| Nov 14, 2024, 09:11 AM IST
1/10

chondhaladevi

केवळ लग्न न होणं इतकीच गोष्ट नाही तर या गावातील इतरही अनेक गोष्टी फारच गूढ आहेत. जाणून घेऊयात हे गाव आहे तरी कुठे आणि त्यात अशा प्रथा का पाळल्या जातात याबद्दल...

2/10

chondhaladevi

तुळशीच्या लग्नानंतर लग्न मुहूर्तांना सुरुवात होते. लग्नसराईची रेलचेल तुळशी विवाहानंतर सुरु होत असली तरी महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे आजपर्यंत कधीच लग्नच झालेलं नाही. याच गावाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 

3/10

chondhaladevi

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील एका अनोख्या गावाबद्दल तुम्ही महाराष्ट्रात राहत असलात तरी फार क्वचितच ऐकलं असेल. या गावातील अनेक गोष्टी फार रहस्यमय आहेत. या गावात लग्न होत नाही हे या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. 

4/10

chondhaladevi

महाराष्ट्रातील या गावात एकही दुमजली घर नाही. तसेच गावातील एकाही घरात खाट किंवा पलंग नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या गावात अजून एकही लग्न झालेलं नाही. या गावाबद्दल मराठवाड्यातील अनेकांना कल्पना असली तरी या गावातील सदर गोष्टी अशा का याचं गूढ फारच रंजक आहे.  

5/10

chondhaladevi

स्थानिकांच्या सांगण्यांनुसार गावाच्या वेशीवर ग्रामदेवतेचे मंदिर आहे. या ग्रामदेवतेच्या प्राचीन मंदिरामध्ये असलेल्या देवीवरील श्रद्धेमुळेच गावात या जगावेगळ्या परंपरांचं पालन केलं जातं. या देवीचं मंदिर पूर्वी दोन मजल्यांचं होतं असं गावकरी सांगतात. मात्र वरचा मजला कोसळल्यानंतर गावात कोणीच दोन मजली घर बांधण्याची हिंमत करत नाही आणि या पुढेही करणार नाही असं गावकरी सांगतात. अन्य एका मान्यतेनुसार देवीच्या मंदिरापेक्षा आपल्या घराची उंची अधिक असू नये अशी गावकऱ्यांची मान्यता असल्याने कोणीच दुमजली घर बांधत नाही.  

6/10

chondhaladevi

या गावाचं नाव आहे चौंढाळा! तर येथील ग्रामदेवतेचं नाव आहे रेणुका माता देवी! या गावातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील गावकरी अंथरुण टाकून झोपत नाहीत. येथील अगदी लहान मुलांनाही जमीनीवर झोपवलं जातं. यावर उपाय म्हणून अनेकांनी घरातच कमी उंचीचे ओटे बांधून घेतले असून त्यावरच ते झोपतात.   

7/10

chondhaladevi

या गावात लग्नंही होत नाहीत कारण... : गावकऱ्यांच्या मान्यतेनुसार देवी अविवाहित आहे. त्यामुळेच गावामध्ये मंगलाष्टके म्हणत नाहीत. म्हणजेच गावात लग्न लावली जात नाहीत. त्यामुळेच या गावातील मुला-मुलींची लग्न गावाच्या वेशीबाहेरच होतात. मात्र लग्नानंतरच्या सर्व विधी गावात केल्या जातात.  

8/10

chondhaladevi

गावकऱ्यांच्या मान्यतेनुसार देवीचा विवाह ठरला होता. मात्र त्यामध्ये एका राक्षसाने अडथळा आणला. त्यानेच देवीशी लग्न करण्याची मागणी केली. मात्र देवीने हा प्रस्ताव फेटाळला आणि त्या राक्षसाला श्राप दिला. या श्रापामुळे या गावातच राक्षसाची टोळी नष्ट झाली.

9/10

chondhaladevi

मात्र राक्षसाबरोबर झालेल्या संघर्षाच्या गोंधळात देवीचा विवाह झालाच नाही. या न झालेल्या विवाहाची काही चिन्हं आजही गावात आणि आजूबाजूच्या परिसरात दिसून येतात.   

10/10

chondhaladevi

या गावातील अनेकजण बाहेर स्थायिक झाले असले तरी त्यांची देवीवरील श्रद्धा कायम आहे. म्हणूनच हे लोक गावी येतात तेव्हा सर्व प्रथा-परंपरा अगदी काटेकोरपणे पाळतात. (सर्व फोटो सोशल मीडिया आणि रॉयटर्सवरुन साभार, काही फोटो प्रातिनिधिक आहेत.) (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)