WWE चे 5 खतरनाक रेसलर, रिंगमध्ये भल्याभल्यांना चारली धूळ आता अभिनयातही सुपर हिट

WWE च्या सुपरस्टार रेसलरला तुम्ही अनेकदा रिंगमध्ये विरुद्ध खेळाडूंना धूळ चरताना पाहिलं असेल. रिंगमध्ये एकापेक्षा एक ऍक्शन मूव्ह करणाऱ्या काही रेसलर्सनी अभिनय क्षेत्रात सुद्धा आपले नशीब आजमावले. तेव्हा रिंग सोबतच अभिनय क्षेत्रातही हिट ठरलेल्या WWE च्या 5 रेसलर्सबद्दल जाणून घेऊयात. 

Pooja Pawar | Sep 14, 2024, 15:12 PM IST
1/5

द रॉक :

द रॉक हे WWE मधील एक मोठं नाव आहे. सध्या रॉक रेसलिंगपासून दूर असला तरी काहीवेळा WWE च्या स्टोरी लाईनमध्ये पाहायला मिळतो. हॉलिवूडमध्ये द रॉकची फॅन फॉलोईंग खूप जास्त असून रेसलिंग सोबतच लोक त्याच्या अभिनयाचे सुद्धा फॅन आहेत. त्यामुळे द रॉक हा हॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने रेड नोटिस, सेंट्रल इंटेलिजेंस, एडम ब्लॅक, जुमांजी, जंगल सर्कस आणि फास्ट एंड फ्यूरियस सीरीज सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

2/5

जॉन सीना :

WWE मधील सर्वात यशस्वी रेसलर पैकी एक असणारा जॉन सीना आता अभिनय क्षेत्राकडे वळला असून त्यातही तो हिट ठरत आहे. सीनाने हा त्या रेसलर्सपैकी एक आहे ज्याने रिंगमध्ये केन, अंडरटेकर, द ग्रेट खली सारख्या रेसलर्सना धूळ चारली होती. जॉन सीना आता WWE मध्ये खूप कमी दिसतो, त्याने स्वतःला अभिनय क्षेत्रात झोकून दिले आहे. जॉन सीनाने हॉलिवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं असून प्लेइंग विथ फायर, वेकेशन फ्रेंड्स, ब्लॉकर्स अशा चित्रपटांचा समावेश आहे. 

3/5

डेव बटिस्टा :

WWE मध्ये ऍनिमल या नावाने प्रसिद्ध असलेला डेव बटिस्टा हा सुद्धा आता पूर्णपणे अभिनय क्षेत्रात उतरला आहे. यासाठी बटिस्टाने वजन सुद्धा कमी केलं असून त्याला ओळखणं सुद्धा फॅन्ससाठी कठीण बनलंय. बटिस्टाने हॉलिवूडमध्ये 20 पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मार्वल सीरिजच्या चित्रपटांमध्ये दिलेल्या परफॉर्मन्ससाठी त्याची खूप प्रशंसा करण्यात आली. याशिवाय बटिस्टाने एवेंजर्स एंड गेम, गार्डियन ऑफ गॅलेक्सी आणि फायनल स्कोर या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

4/5

​रँडी ऑर्टन :

रँडी ऑर्टन हा WWE मधला खतरनाक रेसलर आहे. WWE मध्ये ऑर्टन सध्या मुख्य स्टोरी लाइनचा पार्ट आहे मात्र काही दिवसांपूर्वी तो अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी रेसलिंगपासून दूर गेला होता. ​रँडी ऑर्टनने हॉलीवुड 12 राउंड्स रीलोडेड आणि द कंडेम्न 2 सारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 

5/5

रोमन रेंस :

सध्याच्या घडीला रोमन रेंस हा WWE मधला सर्वात मोठा सुपरस्टार आहे. खूपच कमी वेळेत रोमन रेंसने अनेक दिग्गज रेसलर्सला रिंगमध्ये धूळ चारली आहे. रोमन रेंसने WWE सोबतच हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची कमाल दाखवली आहे. त्याने फास्ट अँड फ्युरियस प्रस्तुत हॉब्स अँड शॉ चित्रपटात दमदार काम केले.