यंदा दसऱ्याला रव्यापासून बनवा 'हा' नवीन गोड पदार्थ, झटपट होणारी Recipe

Dasara Special Recipe: दसऱ्याला खीर-पुरी किंवा श्रीखंड पुरी असा नेहमीचा बेत असतो. मात्र यंदाच्या दसऱ्याला तुम्ही एक हटके पदार्थ बनवू शकता.  यंदाच्या दसऱ्याला रव्यापासून तुम्ही हटके असा गोड पदार्थ बसवू शकता. हा पदार्थ अगदी पटकन होणारा व चवीलाही खूप छान लागते. 

Mansi kshirsagar | Oct 08, 2024, 16:07 PM IST
1/7

delicious Appe with rabdi recipe for Dussehra

यंदा दसऱ्याला रव्यापासून बनवा 'हा' नवीन गोड पदार्थ, झटपट होणारी Recipe

 यंदाच्या दसऱ्याला रव्यापासून तुम्ही हटके असा गोड पदार्थ बसवू शकता. हा पदार्थ अगदी पटकन होणारा व चवीलाही खूप छान लागते. 

2/7

  delicious Appe with rabdi recipe for Dussehra

 रव्याचे गोड आप्पे आणि रबडी कसे बनवायचे याची झटपट होणारी रेसिपी पाहा. 

3/7

कृती

  delicious Appe with rabdi recipe for Dussehra

1 लीटर दूध, दोन कप रवा, साखर, केसर, नारळाचे दूध, भिजवून घेतलेले पोहे, तूप, वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स, मिल्क पावडर, 

4/7

साहित्य

  delicious Appe with rabdi recipe for Dussehra

दोन वाट्या रव्यांसाठी दीड वाटी साखर घ्या. त्यात नारळाचे दूध घालून घ्या. हे सर्व मिश्रण एकत्र करुन घ्या. त्यानंतर यात भिजवलेले पोहे कुस्करुन त्या मिश्रणात घालून चांगले एकजीव करा. 

5/7

  delicious Appe with rabdi recipe for Dussehra

या मिश्रणात आता थोडे तूप आणि ड्रायफ्रुट्सचे काप टाकून पुन्हा मिक्स करुन घ्या. नंतर हे बॅटर पाच ते दहा मिनिटे ठेवून द्या. 

6/7

  delicious Appe with rabdi recipe for Dussehra

आता ड्रायफ्रुट्सचे काप एका वाटीत घ्या. त्यानंतर यात मिल्क पावडर आणि केसर दूध घालून एकजीव करुन घ्या. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करुन घ्या. 

7/7

  delicious Appe with rabdi recipe for Dussehra

आता आप्प्याचे भांडे गॅसवर ठेवा. त्यात थोडे तूप टाकून त्यात सुरुवातीला आप्प्याचे पीठ घाला नंतर आधी केलेले ड्रायफ्रुट्सचे गोळे त्यावर ठेवा. त्यानंतर पुन्हा एकदा वरुन पीठ घाला. सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घ्या.