Cricketers Meal: क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडू कोणता आहार घेतात? पहिल्यांदाच झाला खुलासा

Cricketers Meal: आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळण्यासाठी खेळाडू तंदुरुस्त असणं गरजेचं असतं. मैदानात चपळता दाखवण्यासाठी खेळाडूमध्ये उर्जा असायला हवी. सराव आणि मेहनतीबरोबरच खेळाडूंसाठी आहारही (Meal) तितकाच महत्त्वाचा असतो. खेळाडूंचा सर्वाधिक कस लागतो तो पाच दिवसांच्या कसोटी (Test) सामन्यात. कसोटी सामन्यादरम्यान खेळाडू कोणता आहार घेतात, याचा पहिल्यांदाच खुलासा झाला आहे. 

राजीव कासले | Aug 24, 2023, 18:36 PM IST
1/6

आजच्या स्पर्धेच्या युगात क्रिकेटही वेगवान झालं आहे. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटला जास्त लोकप्रियता मिळू लागली आहे. पण खेळाडूंचा खरा कस लागतो तो कसोटी सामन्यात. सतत पाच दिवस खेळाडूंना मैदानात उभं राहावं लागतं. यासाठी खेळाडूच्या एनर्जी आणि फिटनेसची कसोटी लागते. पण त्याचबरोबर खेळाडूंचा डाएटही तितकाच महत्त्वाचा असतो. 

2/6

कसोटी क्रिकेटमध्ये फिल्डिंगदरम्यान खेळाडूंना भर उन्हात मैदानात तासनतास उभं राहावं लागतं. यासाठी खेळाडूंना विशेष आहार दिला जातो. लंचमध्ये खेळाडूंना पचनाला हलके पदार्थ दुपारच्या जेवणात दिले जातात. ज्यामुळे मैदानात खेळाडूंना कोणताही त्रास होऊ नये. 

3/6

कसोटी क्रिकेटदरम्यान खेळाडूंना सकाळचा नाश्ता किंवा दुपारच्या जेवणात पोटभर खाण्याची परवानगी दिली जात नाही. सकाळच्या नाश्तात ब्राऊन ब्रेड, प्रोटीन बार, पीनट बटर आणि केळी दिली जातात. 

4/6

सोटी क्रिकेटदरम्यान दुपारच्या जेवनात कार्बोहाइड्रेट आणि प्रोटीन युक्त पदार्थ दिले जातात. यामुळे मैदानात धावताना खेळाडूला थकवा जाणवू नये. 

5/6

दुपारच्या जेवनात खेळाडूंना साधारण उकडलेलं चिकन, फ्रूट सलाड, ब्राऊन राईस, प्रोटीन बार आणि हिरव्या भाज्या दिल्य जातात. 

6/6

दुपारच्या जेवनात खेळाडूंना भरपेट जेवनाची परवानी नसते. किंवा अतिरिक्त पाणी पिण्याची मूभा दिली जात नाही. खेळाडूंना सुस्ती येईल किंवा पचनास जड जातील असे पदार्थ देणं टाळलं जातं.