बायोपिकमध्ये तुझी भूमिका कुणी करावी? ना विकी ना रणवीर, युवराजने घेतलं 'या' अभिनेत्याचं नाव!

Yuvraj singh On Ranveer Kapoor : टीम इंडियाला दोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या युवराज सिंगची ख्याती जगभरात पोहोचली आहे.

Saurabh Talekar | Jan 16, 2024, 15:54 PM IST

Yuvraj Singh Biopic : आपल्या दमदार कामगिरीने अनेक गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या युवराजने एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं आहे.

1/7

हॅरी टांग्री

काही दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर चित्रपट आला होता. त्यावेळी हॅरी टांग्री याची युवराज सिंगची भूमिका अनेकांना भावली. 

2/7

बायोपिक

अशातच आता खुद्द युवराजच्या आयुष्यावर आणि त्याच्या संघर्षावर बायोपिक येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यावर युवराजला, बायोपिकमध्ये तुझी भूमिका कुणी करावी? असा प्रश्न विचारला असता...

3/7

रणबीर कपूर

मी नुकताच अ‍ॅनिमल पाहिला आहे आणि मला वाटतं की रणबीर कपूर माझ्या बायोपिकसाठी योग्य आहे. तसे तर हा पूर्णपणे दिग्दर्शकाचा निर्णय आहे, असं युवराज म्हणाला आहे.

4/7

आनंदाची बातमी

आम्ही सध्या त्यावर काम करत आहोत आणि लवकरच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येऊ, असं म्हणत युवराजने गुड न्यूज दिलीये.

5/7

MS Dhoni - द अनटोल्ड स्टोरी

आत्तापर्यंत क्रिकेटवर अनेक सिनेमे आले आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या 'द अनटोल्ड स्टोरी' बायोपिकमध्ये दिवंगत अभिनेता सुशात सिंग राजपूतने कॅप्टन कूलची भूमिका साकारली होती.

6/7

मिताली राज

तर माजी कर्णधार मिताली राजच्या 'शाब्बास मिथू' या बायोपिकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने मितालीची भूमिका साकारली होती. 

7/7

क्रिकेट आणि बॉलिवूड

दरम्यान, क्रिकेट आणि बॉलिवूड यांच्यातील नातं हे जगजाहीर आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी अशी चित्रपटांना पसंती दिली आहे. युवराज अनेक युवकांचा आजही रोल मॉडेल आहे. त्यामुळे त्याचा चित्रपट हिट ठरेल, यात शंका नाही.