शेवटची विकेट घेत संघाला बनवलं चॅम्पियन, मुंबईकडून धवल कुलकर्णीला अविस्मरणीय निरोप

Dhawal Kulkarni : मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात विदर्भाचा पराभव करत रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं. या सामन्याबरोबर मुंबईने स्टार खेळाडू धवल कुलकर्णीला विजयी निरोप दिला. 35 वर्षीय धवल कुलकर्णीचा हा शेवटचा क्रिकेट सामना होता. रणजी ट्रॉफी स्पर्धेपूर्वीच धवल कुलकर्णीने निवृत्ती जाहीर केली होती. 

राजीव कासले | Mar 14, 2024, 16:24 PM IST
1/7

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियासाठी खेळलेल्या धवल कुलकर्णीच्या क्रिकेट कारकिर्दीतला हा शेवटचा सामना होता. या विजयाबरोबर मुंबई संघाने धव कुलकर्णीला अविस्मरणीय निरोप दिला.

2/7

35 वर्षांच्या धवलने 2007 मध्ये मुंबई संघातून रणजी ट्रॉफीत डेब्यू केला. टीम इंडियासाठी तो 12 एकदिवसीय सामने आणि 2 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. 

3/7

मुंबईने विदर्भासमोर विजयासाठी 538 धावांचं बलाढ्य लक्ष्य ठेवलं होतं. धवल कुलकर्णीने मुंबईसाठी शेवटची विकेट घेतली. धवलने उमेश यादवला क्लिन बोल्ड करत मुंबईला चॅम्पियन बनवलं.  

4/7

धवलने या सामन्यात एकूण चार विकेट घेतल्या. पहिल्या डावात त्याने 3 तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणने धवल कुलकर्णीला मॅच फिनिश करण्यासाठी चेंडू सोपवला. आणि धवलने कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरवला नाही.

5/7

मुंबईच्या विजयानंतर धवल कुलकर्णी भावूक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रु तरळले. संघातील सर्व खेळाडूंनी त्याला मिठी मारली. तर क्रिकेट चाहत्यांनी त्याला स्टँडिंग ओवेशन दिलं. 

6/7

धवल कुलकर्णी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 96 फर्स्ट क्लास सामने खेळला. यात त्याने 285 विकेट घेतल्या. तर टीम इंडियासाठी तो 12 एकदिवसीय सामने खेळला असून यात त्याने 19 विकेट घेतल्या.

7/7

मुंबई इंडियन्सने तब्बल 42 व्यांदा रणजी ट्रॉपी पटकावली आहे. याआधी 2015-16 मध्ये मुंबईने शेवटचं जेतेपद मिळवलं होतं. अंतिम सामन्यात मुंबईकडून मुशीर खानने शतक ठोकलं. रणजी ट्रॉफीचा हा 89 वा हंगाम होता.