Cricketers Childhood PICS: जगभरात या स्टार क्रिकेटर्सची नावं, लहानपणीच्या फोटोंवरुन तुम्ही यांना ओळखू शकाल का?

Cricketers Childhood PICS: भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी जगभरात आपल्या खेळातून वेगळी ओळख निर्माण केली. त्यातील काहींचे सुरुवातीचे आयुष्य संघर्षमय होते, तर काहींचे बालपण चांगले गेले. आज जगभरात नाव कमावणाऱ्या अशाच क्रिकेटपटूंची बालपणीची छायाचित्रे पाहा. यावरुन तुम्ही या लहापणीच्या फोटोवरुन गूगल सर्च न करता तुम्हाला यापैकी किती ओळखता येतील?

| Oct 08, 2022, 12:45 PM IST
1/7

क्रिकेटचा देव

क्रिकेटचा देव

भारताचा हा दिग्गज महान फलंदाजांपैकी एक आहे, नाव आहे सचिन तेंडुलकर. कोणत्याही क्रिकेट खेळणार्‍या देशात क्वचितच त्यांच्याशी अपरिचित कोणी असेल. सचिनला 'क्रिकेटचा देव' असेही म्हटले जाते. असे अनेक दिग्गज आहेत जे सचिनला आदर्श मानून या खेळात आले आणि आपला ठसा उमटवला.  सचिनला मास्टर ब्लास्टर असेही संबोधले जाते.

2/7

षटकारांचा बादशहा

षटकारांचा बादशहा

युवराज सिंग हा दिग्गज आहे ज्याने T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये एका षटकात सहा षटकार मारले. युवराजने अनेक वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केले आणि एकट्याने अनेक महत्त्वाचे सामने जिंकले. युवीने कॅन्सरवरही मात केली. 

3/7

'चिकू' या नावानेही ओळखले जाते

 'चिकू' या नावानेही ओळखले जाते

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याचा हा बालपणीचा फोटो आहे. विराटला 'चिकू' या नावानेही ओळखले जाते. मूळचा दिल्लीचा असलेला विराट सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो.

4/7

'द वॉल' म्हणून ओळख

 'द वॉल' म्हणून ओळख

टीम इंडियाचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड लहानपणी खूप गोंडस दिसत होता. हे त्याचे बालपणीचे चित्र आहे. राहुलला 'द वॉल' म्हणूनही ओळखले जाते. जेव्हा तो मैदानावर स्थिरावायचा तेव्हा कोणत्याही गोलंदाजाला त्याची विकेट घेताना घाम फुटायचा. सर्वात गंभीर क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना होते.

5/7

मुल्तान चा सुल्तान

मुल्तान चा सुल्तान

भारताच्या आक्रमक सलामीवीरांपैकी एक असलेल्या वीरेंद्र सेहवागचे हे बालपणीचे छायाचित्र आहे. दिल्लीतील नजफगढचा रहिवासी असलेल्या सेहवागला 'मुल्तानचा सुल्तान' असेही म्हटले जाते. मुल्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने शानदार खेळी केली होती. सेहवागनेच टीम इंडियासाठी ओपनिंगमध्ये धमाकेदार सुरुवात केली होती. 

6/7

टीम इंडियाची कमान

टीम इंडियाची कमान

टीम इंडिया आता 15 वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीत आहे. संघाची कमान रोहित शर्मा याच्याकडे आहे. हे त्याचे चित्र आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचे कर्णधारपदही रोहित शर्मा सांभाळतो. 

7/7

सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक

सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक

भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुली याला कोण ओळखत नाही, पण लहानपणाच्या फोटोवरून त्याला ओळखणे थोडे कठीण होईल. हा त्याचा फोटो आहे. गांगुली सध्या बीसीसीआयच्या सर्वोच्च अर्थात अध्यक्ष पदावर आहे.