मराठमोळ्या अभिनेत्यानं पुण्यात घेतलं सेकेंड होम! टुमदार बंगल्याचे Photos पाहिले का?

Marathi Actor Aroh Velankar New Home: सध्या या अभिनेत्यावर आणि त्याच्या पत्नीवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. या अभिनेत्याने घराचे फोटो शेअर करताना भन्नाट कॅप्शन दिली आहे. नेमका कोण आहे हा अभिनेता आणि त्याचं नवं घर कसं आहे पाहूयात..

Swapnil Ghangale | Nov 12, 2024, 15:26 PM IST
1/11

marathiactorhome

या अभिनेत्याने स्वत: ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियावरुन फोटो पोस्ट करत शेअर केली आहे. नेमका कोण आहे हा अभिनेता आणि कसं आहे हे घर पाहूयात...

2/11

marathiactorhome

सेकेण्ड होम किंवा विकेंड होम किंवा पारंपारिकपणे ज्याला फार्म हाऊस म्हणतात असं दुसरं घर घेण्याचा ट्रेण्ड आता मराठी कलाकारांमध्येही दिसून येत आहे.   

3/11

marathiactorhome

अगदी 'कल्याणची चुलबुली' शिवाली परब असो किंवा पृथ्वीक प्रताप असो अनेकांनी मागील काही काळात घरं विकत घेतली आहेत. मागील काही महिन्यांमध्ये अनेक कलाकारांनी नवीन घरांमध्ये प्रवेश केला. 

4/11

marathiactorhome

काहींनी बंगले घेतले तर काहींनी इतर ठिकाणी हॉटेल किंवा अन्य माध्यमातून स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक केली. यामध्ये आता एका नव्या नावाचा समावेश झाला आहे.  

5/11

marathiactorhome

मराठी नाटक, चित्रपट, मालिका आणि ‘बिग बॉस’सारख्या शोमधून घराघरांत पोहोचलेल्या व नुकताच 'चंदू चॅम्पियन'मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेला मराठमोळा अभिनेता एका छानश्या सेकेण्ड होमचा मालक झाला आहे.  

6/11

marathiactorhome

पुण्यात ‘सेज व्हिला’ या प्रोजेक्टमध्ये अभिनेत्याने एक टुमदार बंगला बूक केला आहे. या सेकेण्ड होमचे फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  

7/11

marathiactorhome

“नवीन हँगआउट स्पॉटला ‘हॅलो’ म्हणा…” असं भन्नाट कॅप्शन देत या अभिनेत्याने नवीन घराचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या नवीन बंगल्याला मॉडर्न लूक देण्याचा प्रयत्न फोटो पाहिल्यावरच दिसून येतो.

8/11

marathiactorhome

आता आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे, आरोह वेलणकर! (Aroh Welankar)

9/11

marathiactorhome

10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 साली प्रदर्शित झालेल्या ‘रेगे'मधून या अभिनेत्याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. पाहता पाहता मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून आणि रिअॅलिटी शोमधून तो घरोघरात पोहोचला.

10/11

marathiactorhome

त्याने घर खरेदी केल्यानंतर आपल्या पत्नीबरोबर या घराबाहेर काढलेला फोटो इन्स्टाग्राम स्टोरीलाही ठेवला होता.

11/11

marathiactorhome

या नव्या घरासाठी अनेक सेलिब्रिटींपासून चाहत्यांनी आरोह आणि त्याच्या पत्नीवर अभिनंदनाचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळत आहे.