450 रुपये जुडी... घरच्या घरी करा कोथिंबीरीची लागवड; ना खताची गरज ना मातीची, फक्त...

कोथिंबीरीची घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने करा लागवड 

| Sep 03, 2024, 10:58 AM IST

कोथिंबीर हा प्रत्येक पदार्थांवर वापरली जाते. पण या कोथिंबीरीच्या दराने चक्क उच्चांक गाठला आहे. अशावेळी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने लावा कोथिंबीर. 

1/8

अगदी गणेशोत्सवाच्या तोंडावर भाजीपाला आणि कोथिंबीरीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 10 रुपयांचा मसाला खरेदी करुन किचन बजेट सांभाळणाऱ्या महिलांना मोठ्या दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. कोथिंबीरीच्या दरात वाढ झाली असून एक जुडी 450 रुपये इतकी झाली आहे. अशावेळी कोथिंबीर खायची की नाही हा प्रश्न सामान्यांना पडत असताना अगदी घरच्या घरी छोट्याशा  कुंडीत तुम्ही कोथिंबीरीची लागवड करु शकता.   

2/8

पहिली पद्धत

कोथिंबीरीची लागवड करण्यासाठी चांगली गणवत्तेची, सैलसर अशी चांगली माती घ्या. मध्यम आकाराची कुंडी आणि जैविक खाद्याच्या मदतीने तुम्ही कोथिंबीर लावू शकता. कुंडीत चांगल्या क्वालिटीचे धने तुम्ही लावू शकता. याला नि

3/8

महत्त्वाचं म्हणजे या कुंडीला चांगल्या प्रकारे उन्ह लागणे गरजेचे आहे. तसंच हे रोप येताना त्याला किड्या किंवा चिमण्यांपासून वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. हे पिक तुम्ही दररोज घेऊ शकता. 

4/8

धणे चोवीस तास पाण्यात भिजवल्यानंतर ओलसर जमिनीत १/२ इंच खोलीपर्यंत पेरणी करा. बिया मातीने झाकून हलके दाबा. भांडे उबदार ठेवा. माती नियमितपणे ओलसर ठेवा, परंतु जास्त पाणी देऊ नका.

5/8

रोपांची काळजी घेण्यासाठी त्यांना दर आठवड्याला हलके खत द्यावे. कीटक आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी झाडे नियमितपणे तपासली पाहिजेत. कोथिंबीर तयार करण्यासाठी ही पद्धत सोपी पडेल. 

6/8

दुसरी पद्धत

मातीप्रमाणेच कोथिंबीर पाण्यातही लावू शकतो. यासाठी सुरुवातीला धणे थोडे ठेचून घ्या. धण्याच्या बिया एका जाळीमध्ये पसरवा. ही जाळी पाण्याने भरलेल्या भांड्यावर अगदी सहज राहील अशी ठेवा. 

7/8

तिसरी पद्धत

कोथिंबीरीची घरच्या घरी लागवड करण्याची ही सोपी आणि तिसरी पद्धत. यामध्ये तुम्ही बाजारातून आणलेल्या कोथिंबीरीचे देढ कापून ठेवा. यानंतर एका प्लास्टिकच्या बॉटलचे दोन भाग करा. खालच्या भागात थोडं पाणी आणि मीठ घाला. त्यानंतर बॉटलचा वरचा भाग उलटा करुन त्यामध्ये कोथिंबीरीचे कापलेले देढ ठेवा. हे देढ थोडे पाण्यात भिजतील अशी काळजी घ्या. ही बॉटल थोडं उन्ह लागेल अशा पद्धतीने खिडकीजवळ ठेवा. 

8/8

15 दिवसांमध्ये तुम्हाला कोथिंबीरीचं रोप थोडं वर आलेलं दिसेल. ही कोथिंबीर अगदी तुम्ही घरच्या घरी तयार करु शकता.