PM Modi Brunei Visit: बोईंग विमानं, 7000 कार्स, 2250 कोटींचा गोल्डन पॅलेस; अफाट श्रीमंत व्यक्तीची पंतप्रधान मोदी घेणार भेट

PM Modi Visit Sultan of Brunei: जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत असलेल्या ब्रुनेईचे सुलतान हसनल बोलकिया यांच्या देशात पंतप्रधान मोदी जाणार आहेत. मोदी आजपासून (3 सप्टेंबर) ब्रुनेईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. 

Sep 03, 2024, 15:48 PM IST
1/9

वयाच्या 21 व्या वर्षी 1967 मध्ये ब्रुनेईचे सिंहासनवर सुलतान हाजी हसनल बोलकिया विराजमान झालेत. 4.5 लाख लोकसंख्या असलेल्या ब्रुनेईवर 600 वर्षांपासून बोलकिया कुटुंब राज्य करत आहे. सुलतान हाजी हसनल हे बोलकिया राजघराण्याचे 29 वे वारस आहेत. ते ब्रुनेईचे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्रीसुद्धा आहेत.

2/9

ब्रुनेईचा सुलतान हाजी हसनल बोलकिया हे जगातील श्रीमंतांपैकी एक असून त्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. 2009 मध्ये फोर्ब्सनुसार हसनलची संपत्ती 1.36 लाख कोटींच्या घरात होती. तर अलीकडील अहवालांमध्ये दावा करण्यात आला आहे की आता त्यांची संपत्ती 2.88 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाल्याची नोंद आहे. 

3/9

ब्रुनेईचा सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत तेलाचे साठे आणि नैसर्गिक वायू आहे. त्यामुळे अशात पंतप्रधान मोदी या दौऱ्यावर कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करतात हे पाहावं लागणार आहे. 

4/9

ब्रुनेईचा सुलतान हाजी हसनल बोलकिया यांना गाड्यांची खूप आवड असून त्यांच्याकडे जवळपास 7000 कार आहेत. यामध्ये 600 Rolls Royce, 300 Ferraris, 134 Koenigseggs, 11 McLaren F1s, 6 Porsche 962 MS आणि अनेक Jaguar कारचा समावेश आहे. या गाड्या ठेवण्यासाठी त्यांच्या वाड्यात 110 गॅरेज बांधण्यात आले आहेत. ब्रुनेईच्या सुलतानच्या 200 घोड्यांसाठी एक वातानुकूलित स्टेबल देखील उपलब्ध आहेत. 

5/9

ब्रुनेईचा सुलतान हाजी हसनल बोलकिया यांचा 2 दशलक्ष स्क्वेअर फूट पसरात राजवाडा पसरलेला आहे. जो 1984 मध्ये बांधला गेला होता. त्यांचा 'इस्ताना नुरुल इमान पॅलेस' हा जगातील सर्वात मोठा पॅलेस असून त्याचं नाव गिनीज बुकमध्येही नोंदवलं गेलं असल्याचा दावा करण्यात आलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुलतानच्या पॅलेसची किंमत 2250 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

6/9

सुलतानचा राजवाडा इस्ताना नुरुल इमान पॅलेसमध्ये 1700 खोल्या, 257 बाथरूम, 5 स्विमिंग पूल आणि 110 गॅरेज आहेत. या राजवाड्याचा घुमट 22 कॅरेट सोन्याने मढवला आहे. याशिवाय राजवाड्याच्या भिंतींवरही सोन्याने मढवलेले आहेत.

7/9

ब्रुनेईचा सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्याकडे कार तसंच खाजगी जेट विमानांचा मोठा संग्रह आहे. त्याच्याकडे बोईंग 747-400, बोईंग 767-200 आणि एअरबस ए34-200 अशी खाजगी विमाने त्यांच्याकडे आहेत. 

8/9

अहवालानुसार, ब्रुनेईच्या सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्या मालकीच्या खाजगी जेटमध्येही सोनं आहे. ज्याची किंमत सुमारे 3359 कोटी रुपये आहे. विमानातील वॉश बेसिनदेखील सोन्याचं बनवलंय. जेटच्या आतील भिंती सोन्याने मढवल्या आहेत. एवढंच नाही तर जेटच्या फरशीवर सोनेरी तारे असलेले कार्पेटही टाकण्यात आलंय. या जेटमध्ये दिवाणखान्यापासून अनेक बेडरूमपर्यंत सर्व गोष्टींची व्यवस्था आहे आणि लक्झरी जीवनशैली आहे.

9/9

ब्रुनेईचा सुलतान हाजी हसनल बोलकिया यांची तीन लग्न केलंय. ब्रुनेईच्या सिंहासनावर बसण्याच्या दोन वर्षांपूर्वी, 1965 मध्ये त्यांनी पेंगिरन अनाक हाजा सालेहाशी लग्न केलं. यानंतर त्यांनी 1981 मध्ये मरियम अब्दुल अजीज आणि 2005 मध्ये अझरीनाज मजहर यांच्याशी लग्न केलं. मात्र, त्याने 2003 मध्ये मरियम आणि 2010 मध्ये अरिनाजला घटस्फोट दिला.