Protein Fruits: या फळांचं सेवन करणं आरोग्यवर्धक, शरीरातील प्रोटीनची उणीव भरून काढणार

फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.म्हणूनच निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आहारात फळांचा समावेश केला पाहिजे.अनेकांना वाटते की फळांमध्ये फक्त जीवनसत्त्वे असतात आणि प्रथिने नसतात. आज आम्ही प्रथिनांची उणीव भरून काढण्यासाठी फळं किती महत्त्वाची आहेत, याबाबत सांगणार आहोत.

Dec 21, 2022, 15:08 PM IST
1/5

protein fruits

पेरूमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. तसेच पेरूमध्ये प्रोटीन असतात. प्रोटीनची उणीव दूर करण्यासाठी रोज एक पेरू जरूर खा.

2/5

protein fruits

किवीमध्ये भरपूर पोषक असतात. व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, किवीमध्ये प्रोटीन देखील असतात. त्यामुळे प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी किवी फायदेशीर आहे.

3/5

protein fruits

केळी या फळाला आरोग्यवर्धक म्हटलं जातं. म्हणूनच केळीचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. केळ्यामध्ये व्हिटॅमिनचे प्रमाण चांगले असते, तसेच प्रोटीनचे प्रमाणही असते.  

4/5

protein fruits

एव्होकाडोमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. याशिवाय एव्होकाडोमध्ये प्रोटीन देखील असते. म्हणूनच दररोज सेवन करू शकता.

5/5

protein fruits

बेरी स्वादिष्ट तसेच पौष्टिक असतात. बेरीमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. याशिवाय बेरीमध्ये प्रोटीनचे प्रमाणही चांगले असते.