पाकिस्तानचा 'हा' स्टार खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी लग्न करणार

इंग्लंडने पाकिस्तान विरूद्धची टेस्ट मालिका 3-0ने जिंकली आहे. इंग्लंडने व्हाईटवॉश देत पाकिस्तानचा पराभव केला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानची नाच्चकी झाली आहे. 

Dec 20, 2022, 22:00 PM IST

Shaheen Shah Afridi Marriage: इंग्लंडने पाकिस्तान विरूद्धची टेस्ट मालिका 3-0ने जिंकली आहे. इंग्लंडने व्हाईटवॉश देत पाकिस्तानचा पराभव केला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानची नाच्चकी झाली आहे. पाकिस्तानचा जरी पराभव झाला असला तरी फॅन्ससाठी गुडन्यूज आली आहे. पाकिस्तानचा स्टार खेळाडू लग्नबंधनात अडकणार आहे. हा खेळाडू कोण आहे हे जाणून घेऊयात. 

1/5

Shaheen Shah Afridi

 पाकिस्तान संघाचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. शाहीन आफ्रिदीचं लग्न माजी स्टार क्रिकेटर शाहिद आफ्रिदीची मुलगी अक्सा आफ्रिदीशी होणार आहे. शाहीन शाह आफ्रिदी 3 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे. शाहीनने दोन वर्षांपूर्वीच अंशा आफ्रिदीशी एंगेजमेंट केली होती. 

2/5

Shaheen Shah Afridi

अक्सा आणि शाहीन आफ्रिदी लग्न करणार आहेत. हा सोहळा कराचीमध्ये पार पडणार असून रिसेप्शनची तारीख अद्याप ठरलेली नसल्याची माहिती शाहिद आफ्रिदीने एका चॅनेलला दिली आहे.  

3/5

Shaheen Shah Afridi

शाहीन शाह आफ्रिदी हा पाकिस्तानच्या सर्व फॉरमॅटमध्ये अतिशय महत्त्वाचा वेगवान गोलंदाज आहे. त्याने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 25 कसोटी, 32 एकदिवसीय आणि 47 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 99, एकदिवसीय सामन्यात 62 आणि टी-20 मध्ये 58 विकेट आहेत.

4/5

Shaheen Shah Afridi

शाहीन शाह आफ्रिदीशिवाय पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज हरिस रौफही विवाहबंधनात अडकणार आहे.

5/5

Shaheen Shah Afridi

हारिस रौफ या महिन्याच्या 26 तारखेला त्याच्या वर्गमित्रिणीशी लग्न करणार आहे.