आदि देव शंकरा! राहुल गांधी केदारनाथाचरणी, पाहा खास Photos

Rahul Gandhi Kedarnath Visit : राजकारणाच्या विश्वात रमलेले राहुल गांधी मागील काही काळापासून नागरिकांशी असणारं नातं जपण्यासाठी त्यांच्यामध्येच जाऊन भेटीगाठी करताना दिसत आहेत.   

Nov 06, 2023, 08:59 AM IST

Rahul Gandhi Kedarnath Visit : काँग्रेस नेते राहुल गांधी 3 दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या याच दौऱ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

1/7

हेलिकॉप्टरने केदारनाथला पोहोचले.

congress leader Rahul Gandhi Kedarnath Visit photos

काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तराखंडमधील जॉली ग्रँट विमानतळावर उतरल्यानंतर थेट हेलिकॉप्टरने केदारनाथला पोहोचले. केदारनाथ धाममध्ये त्यांनी विधीवत पूजा केली.   

2/7

केदारनाथ मंदिरात प्रवेश

congress leader Rahul Gandhi Kedarnath Visit photos

सर्वसामान्य भाविकांप्रमाणंच त्यांनी गर्दीतून वाट काढत केदारनाथ मंदिरात प्रवेश केला आणि दर्शन घेतलं.   

3/7

भाविकांसोबत संवाद

congress leader Rahul Gandhi Kedarnath Visit photos

सर्वांचं सुखी आयुष्य आणि समाधानासाठी त्यांनी यावेळी प्रार्थना केली. केदारनाथ मंदिरातील पुरोहित आणि तिथं आलेल्या भाविकांसोबत यावेळी राहुल गांधी यांनी संवाद साधला. 

4/7

केदारनाथमध्ये 2 दिवस मुक्काम

congress leader Rahul Gandhi Kedarnath Visit photos

सूत्रांच्या माहितीनुसार आता केदारनाथमध्ये 2 दिवस मुक्काम करणार आहेत. 

5/7

भेट घेण्यासाठी गर्दी

congress leader Rahul Gandhi Kedarnath Visit photos

दरम्यान, सध्याच्या घडीला राहुल गांधी या भागात आल्याचं कळताच अनेकांनी त्यांची भेट घेण्यासाठी गर्दी केली आहे. 

6/7

सुरक्षेचा फौजफाटा

congress leader Rahul Gandhi Kedarnath Visit photos

त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या केदारनाथ मंदिर परिसरात सुरक्षेचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे. 

7/7

दौरा पूर्णपणे खासगी

congress leader Rahul Gandhi Kedarnath Visit photos

दरम्यान, त्यांचा हा दौरा पूर्णपणे खासगी असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळं या दौऱ्यावर आता विरोधकांची नेमकी काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.