Cholesterol Remedy: कोलेस्टेरॉलची पातळी वाढली मग ही 5 फळ खा, हार्ट अटॅकचा धोक कमी होईल

Warning signs and remedy of high cholesterol: जेव्हा जास्तप्रमाणात फॅट आणि ट्रायग्लिसराइड्स असलेले पदार्थ खाल्ले जातात, तेव्हा कोलेस्टेरॉलसारख्या आजाराला सामोरे जावे लागते. अशा परिस्थिती शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असेल या फळाचा वापर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. जाणून घ्या सविस्तर माहिती...

Jan 13, 2023, 16:17 PM IST

Common Signs Of High Cholesterol:  शरीरात कोलेस्ट्रॉल वाढणे ही कोणत्याच पद्धतीने शरीरासाठी चांगली गोष्ट नाही. रक्ताच्या नसांमध्ये असणारे हे कोलेस्ट्रॉल मेणासारखे दिसते. कोलेस्ट्रॉल हे शरीरासाठी काही प्रमाणात उपयोगी असेल तरी शरीरातील कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढल्याने हृदयाचे आजार, हृदय विकाराचा झटका आणि हार्ट स्ट्रोक यांसारखे घातक आजर उदभवू शकतात. त्यामुळे तुमच्या आहारात या पाच फळांचा समावेश करा.

1/5

पपई- खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पपई जास्त फायदेशीर ठरेल. फायबर समृद्ध पपई उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवते. फायबर पचन सुधारण्यास मदत करते आणि आतडे देखील स्वच्छ करते.   

2/5

स्ट्रॉबेरी- शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी हे उत्तम फळ आहे. हे अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे, जे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

3/5

सफरचंद- सफरचंद हे कोलेस्ट्रॉलच नाही तर शरीरात जमा होणारे इतर हानिकारक पदार्थही कमी करू शकते. सर्व हृदयरोगींनी त्यांच्या आहारात सफरचंद या फळाचा समावेश करावा जेणेकरून कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.   

4/5

लिंबूवर्गीय फळे- हृदयाशी संबंधित आजार दूर करण्यासाठी लिंबूवर्गीय फळे खाणे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही तुमच्या आहारात लिंबू आणि संत्र्यासारखी लिंबूवर्गीय फळे समाविष्ट करू शकता. कारण ते व्हिटॅमिन सी ने भरलेले असतात.  

5/5

द्राक्षे- द्राक्षे फायबरचा उत्तम स्रोत आहेत. द्राक्षांचे नियमित सेवन केल्याने नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.