Chhatrapati Sambhaji Maharaj Death Anniversary : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त Photo, WhatsApp द्वारे स्मृतीस अभिवादन
संभाजी महाराजांचा जन्म 14 मे इ.स. 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू शंभूराजांना लहानपणापासूनच मिळाले होते. संभाजी महाराज लहान असतानाचं त्यांच्या आई महाराणी सईबाईंचे निधन झाले. त्यामुळे संभाजी महाराजांचा सांभाळ राजमाता जिजाबाई यांनी केला. शिवाजी महाराजांप्रमाणेच शंभूराजांनी मराठा साम्राजाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या मेहुण्याने त्यांच्याशी गद्दारी केली. तो मुघलांना जाऊन सामील झाला. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र केशव राजकीय कार्यानिमित्त संगमेश्वरातून रायगडावर परत जात असताना संभाजींवर रागावलेल्या औरंगजेबाने छत्रपती संभाजीं महाराजांना आपल्या ताब्यात घेऊन क्रूरतेच्या आणि अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांची जीभ कापली आणि डोळे काढले. तुळापूरच्या नदीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवाचे विकृत तुकडे फेकले असता काठावर राहणाऱ्या लोकांनी मृतदेहाचे तुकडे गोळा करून त्याला शिवण टाकून पूर्ण पध्दतीने अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले जाते. अशा या शूर राजाचे 11 मार्च 1689 रोजी निधन झाले.
मराठ्यांच्या इतिहासात संभाजी राजांनी मोठी कामगिरी केली आहे. आज संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त Images, WhatsApp द्वारे शंभुराजांच्या स्मृतीस अभिवादन करुया.