छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा, साजरा करा हा मानाचा सोहळा..
Chatrapati Sambhaji Maharaj : स्वराज रक्षक छत्रपती संभाजी राजे यांनी अगदी लहान वयातच मोठी किर्ती मिळवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे स्वराज रक्षणार्थ स्वतःच्या प्राणाचीही पर्वा न करणारे संभाजी राजे म्हणजे अवघ्या रयतेचे शंभूराजे… 16 जानेवारी 1681 मध्ये संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि शंभूराजे मराठा साम्राज्याचे ते दुसरे छत्रपती झाले
Chatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांचा 343 वा राज्याभिषेक सोहळा आज मंगळवारी 16 जानेवारी रोजी पार पडणार. हा सोहळा राजधानी किल्ले रायगडावर होणार आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी राजा सुखी व्हावा म्हणून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतीविषयी धोरण अवलंबून दुष्काळी परिस्थितीत रयतेला आधार दिला. शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये, मुलुखगीरी करत असता आपणास जो जिन्नस लागेल तो त्याचा योग्य मोबदला देऊनच घ्यावा हाच शिरस्ता छत्रपती संभाजीमहाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती थोरले शाहू महाराज ते राजर्षी शाहू महाराज यांनी घेतला आणि काळानुसार बदल करत शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योगदान दिले होते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मानाचा मुजरा. आपल्या स्वराजाच्या धाकल्या धनाला या मॅसेजच्या माध्यमातून द्या मानाचा मुजरा.