आता ट्रिप दरम्यान गॅजेट्स चार्ज करण्याची चिंता संपली, वापरा 'या' टिप्स

स्मार्टफोन हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग झाले आहेत. जर आपल्याला खूप लांब प्रवास करत जायचं असेल तर त्या दरम्यान, फोन चार्ज लवकर संपते. अनेकदा फोनच्या चार्जिंगमुळे लोकांना त्रास होतो. कोणत्याही प्रवासाला जाताना फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस चार्ज करणं गरजेचं आहे. आज त्या संबंधीत काही टिप्स आपण जाणून घेणार आहोत. 

| Jun 09, 2024, 18:32 PM IST
1/7

लांब कुठे फिरायला जाताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी असते तो म्हणजे फोन आणि त्याची चार्जिंग कारण आपल्याला त्यातच फोटो आणि व्हिडीओ हे आठवणी म्हणून काढायचे असतात. 

2/7

पावर बॅंकच्या मदतीनं स्मार्टफोन आणि इतर डिव्हाइस कधीही चार्च करु शकतात. कॉम्पॅक्ट बॅटरीज तुमच्या खिशात राहणारं चार्जिंग स्टेशन आहे. गरजेनुसार तुम्ही वेगवेगळ्या क्षमतेच्या पावर बॅंक घेता. 

3/7

प्रत्येक देशात वेगवेगळ्या प्रकारचे प्लग असतात. त्यामुळे जर तुम्ही दुसऱ्या देशात प्रवास करणार असाल तर तुम्हाला एक युनिव्हर्सल ट्रॅव्हल एडाप्टर खरेदी करणं गरजेचं असतं. काही एडॅप्टर USB पोर्ट देखील देतात. त्यामुळे तुम्ही कोणतेही डिव्हाईस चार्ज करु शकतात. 

4/7

वायरलेस चार्जिंग आजकाल अनेक डिव्हायसेसला सपोर्ट करतं. पोर्टेबल वायरलेस चार्जिंग पॅड घेऊन तुम्ही कुठेही आरामात जाऊ शकतात. 

5/7

एक मजबुत अशी मल्टी-टिप असलेली केबल घ्या ज्यात USB-C, लायटनिंग आणि माइक्रो-USB कनेक्टर असेल. त्यानं तुम्ही कोणतंही डिव्हाइस चार्ज करु शकतात. 

6/7

जर तुम्ही रोड ट्रिपवर जात आहात. तर कार चार्जर गरजेचं आहे. फास्ट चार्जिंग असलेलं चार्जर घ्या जेणे करुन तुमचं डिव्हाइस लवकर चार्ज होतील. 

7/7

(All Photo Credit :Freepik and Social Media)